'सैराट' चित्रपटातून धडाकेबाज एंट्री करत सर्वांची मनं जिंकणारी आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरु पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रिंकूनं आर्चीच्या भूमिकेतून आपल्या रावडी अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. त्यामुळं अवघ्या महाराष्ट्राला प्रतीक्षा आहे, तिच्या पुढच्या चित्रपटाची…
2/5
'कागर'
रिंकूची मुख्य भूमिका असलेला व मकरंद माने दिग्दर्शित 'कागर' या चित्रपटाचा मुहूर्त समारंभ खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते नुकताच पार पडला.
3/5
राष्ट्रीय पुरस्कार
दिवाळीच्या मुहूर्तावर या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती.मकरंद आणि रिंकू या दोघांना एकाच वेळी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. तसंच मकरंद आणि रिंकू दोघंही अकलूजचे आहेत.
4/5
प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता
पहिल्याच चित्रपटात लक्षवेधी अभिनय करणाऱ्या अभिनेत्रीचा दुसरा चित्रपट कसा असणार, त्यात ती कोणत्या रूपात दिसणार, हा कुतुहलाचा विषय ठरत असून तिच्या पुढच्या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.
मराठीतील सगळे रेकॉर्डस मोडणाऱ्या सैराटनं बॉक्स ऑफिसवर झिंगाट यश मिळवलं. आर्ची आणि परश्याची केमिस्ट्री सगळ्यांचा भावली होती. त्यामुळं आता रिंकूच्या आगामी चित्रपटात तिच्यासोबत कोण झळकणार ही उत्सुकता प्रेक्षकांना आहे.
We use cookies and other tracking technologies to provide services in line with the preferences you reveal while browsing the Website to show personalize content and targeted ads, analyze site traffic, and understand where our audience is coming from in order to improve your browsing experience on our Website. By continuing to browse this Website, you consent to the use of these cookies. If you wish to object such processing, please read the instructions described in our privacy policy/cookie policy.