प्रसिद्ध फॅशन डिझाइनर सब्यसाची मुखर्जी (Sabyasachi Mukherjee) यांनी डिझाइन केलेला लेहंगा, साडी परिधान करण्याची प्रत्येक तरुणीची इच्छा असते. बॉलिवूडमधील अभिनेत्रींमध्येही त्यांच्या डिझाइनर कलेक्शनची क्रेझ पाहायला मिळते. कशीदाकारी एम्ब्रॉयडरी, सुंदर रंगसंगती आणि कपड्यांचं आकर्षक डिझाइन, सारं काही परफेक्ट असतं. त्यांनी डिझाइन केलेल्या पोषाखांवरून नजर दुसरीकडे वळण शक्यच नसते. दुबईतील एका नववधूनही सब्यसाची यांनी डिझाइन केलेली साडी नेसली होती. वेडिंग रिसेप्शन पार्टीसाठी तिनं ईशा अंबानीचा साडी लुक फॉलो केल्याचं पाहायला मिळालं. (फोटो - ब्राइड्स ऑफ सब्यसाची)
डिझाइनर सब्यसाची यांनी आपले सोशल मीडिया हँडल 'ब्राइड्स ऑफ सब्यसाची' वर दुबईतील एक सुंदर नववधू श्रीजिता साहा हीचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिनं सीक्वेंस साडी नेसल्याचं दिसतंय आहे. अशाच पद्धतीची साडी ईशाने अरमान जैन-अनिशा मल्होत्राच्या लग्नसोहळ्यात नेसली होती.
श्रीजिताने स्वतःच्या रिसेप्शन पार्टीसाठी सीक्वेंस डिटेलिंग असणारी सोनेरी रंगाची साडी निवडली होती. यावर तिनं कटआउट स्लीव्ह्ज ब्लाउज परिधान केलं होतं. साडीवर आपण चमचमणारे मोटिफ्स डिझाइन पाहू शकता.
ब्रायडल लुक परफेक्ट दिसावा यासाठी श्रीजिताने वजनदार ऑक्सिडाइझ्ड ज्वेलरी परिधान केल्याचं आपण पाहू शकता. यामध्ये सोने आणि डायमंडपासून तयार करण्यात आलेल्या स्टेटमेंट चोकर नेकलेस आणि मंगळसुत्राचाही समावेश होता. तसंच तिनं डार्क टोन मेकअप करण्यावर भर दिला होता.
श्रीजिता या सुंदर साडीमध्ये प्रचंड मोहक दिसत होती तर दुसरीकडे तिचा पतीही हँडसम दिसत होता. त्यानं काळ्या रंगाचं पँट-सूट घातलं होतं. या दोघींचीही जोडी एकदम परफेक्ट व सुंदर दिसत होती.