अ‍ॅपशहर

'RBI'चे नवे नियम; 'एटीएम'मधून पैसे काढण्यासाठी द्यावे लागणार अधिक शुल्क, हे आहे कारण

पुढील महिन्यापासून सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला चाप बसणार आहे. आरबीआयने या आधीच सूचना जारी केल्या होत्या. त्यानुसार १ ऑगस्टपासून नवे नियम लागू होणार आहेत.

Lipi 22 Jul 2021, 8:49 am
नवी दिल्ली : आजकाल बहुतेक लोक एटीएममधून रोकड काढण्यावर भर देतात. त्यासाठी त्यांना ठरावीक शुल्क भरावे लागते. अलीकडेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) इंटरचेंज फी वाढविण्याचे जाहीर केले होते. यानुसार आर्थिक व्यवहारांसाठी पूर्वीपेक्षा जास्त शुल्क द्यावे लागणार आहे. हा नवा नियम १ ऑगस्ट २०२१ पासून लागू होणार आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम rbi alert atm cash withdrawal debit card and credit card charges increase soon
'RBI'चे नवे नियम; 'एटीएम'मधून पैसे काढण्यासाठी द्यावे लागणार अधिक शुल्क, हे आहे कारण


सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर; 'या' महिन्यापासून जमा होणार महागाई भत्ता
'आरबीआय'च्या नव्या नियमांनुसार, आर्थिक व्यवहारासाठी इंटरचेंज फी १५ रुपयांवरून १७ रुपये करण्यात आली आहे. तर बिगर आर्थिक व्यवहारासाठी ती ५ रुपयांवरून ६ रुपये करण्यात आली आहे. ग्राहक त्यांच्या बँकेच्या एटीएममधून दरमहा पाचवेळा व्यवहार करू शकतात. त्यासाठी त्यांना कोणतेही जादा शुल्क आकारले जाणार नाही, ज्यात आर्थिक आणि गैर-आर्थिक व्यवहारांचा समावेश आहे. तसेच ग्राहक इतर बँकेच्या एटीएममधूनही विनामूल्य व्यवहार करू शकतात. महानगरांमध्ये ग्राहकांना तीन वेळा तर इतर ठिकाणी पाच वेळा व्यवहार करता येऊ शकतो.

क्रिप्टोकरन्सीमध्ये तेजी ; जाणून घ्या आज किती महागले क्रिप्टोकरन्सीज
काय आहे इंटरचेंज शुल्क?
इंटरचेंज शुल्क क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डद्वारे पेमेंट करणाऱ्यांकडून आकारले जाणार शुल्क आहे. जर कोणत्याही एका बँकेचा ग्राहक दुसऱ्या बँकेच्या एटीएममधून आपले कार्ड वापरून पैसे काढत असेल, तर ज्या बँकेच्या एटीएममधून पैसे काढले जात आहेत, ती बँक व्यापारी बँक बनते.

सोन्यामध्ये पडझड सुरूच ; नफवसुलीने कमॉडिटी बाजारात सोने चांदीमधील तेजी ओसरली
ग्राहक शुल्कात होणार वाढ
सध्या ग्राहक शुल्काची मर्यादा प्रत्येक व्यवहारासाठी २० रुपये इतके आहे. त्यात १ जानेवारी २०२२ पासून वाढ करून ती २१ रुपये करण्यात येणार आहे. जादा विनिमय शुल्क आणि किंमतीतील वाढ याची भरपाई करण्यासाठी बँकांचे हित डोळ्यासमोर ठेवून रिझर्व्ह बँकेने बँकांना प्रत्येक व्यवहारावर ग्राहक शुल्कामध्ये वाढ करण्याची परवानगी दिली आहे. ही वाढ १ जानेवारी २०२२ पासून लागू होणार आहे.

डोअरस्टेप बँकिंग हवीय, मोजा जादा पैसे; ऑगस्टपासून ही बँंक शुल्क वाढणार
आयसीआयसीआय बँकेने बजावली नोटीस
रोख व्यवहार, एटीएम इंटरचेंज आणि चेक बुक शुल्कासाठीच्या मर्यादांवर आयसीआयसीआय बँकेने सुधारित नोटीस काढली आहे. पगाराच्या खात्यांसह घरगुती बचत खातेधारकांसाठीही १ ऑगस्टपासून सुधारित शुल्क लागू होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज