अ‍ॅपशहर

साक्षीसाठी जय्यत तयारी

रिओ ऑलिंपिकमध्ये ब्राँझपदक जिंकणारी भारताची कुस्तीपटू साक्षी मलिकचे बुधवारी हरियाणातील रोहतक जिल्ह्यामधील मोखरा खास या तिच्या गावी आगमन होणार असून तिच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे.

Maharashtra Times 24 Aug 2016, 3:28 am
चंडीगड : रिओ ऑलिंपिकमध्ये ब्राँझपदक जिंकणारी भारताची कुस्तीपटू साक्षी मलिकचे बुधवारी हरियाणातील रोहतक जिल्ह्यामधील मोखरा खास या तिच्या गावी आगमन होणार असून तिच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. बुधवारी पहाटे ३.५० वाजता दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर साक्षीचे आगमन होणार आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sakshi malik welcome
साक्षीसाठी जय्यत तयारी


या वेळी तिचे स्वागत करण्यासाठी हरियाणा सरकारमधील पाच मंत्री उपस्थित राहणार आहेत. रोहतक येथे तिचा सत्कार समारंभही आयोजित करण्यात आला असून त्यावेळी ३०,००० लोक उपस्थित राहतील, असा अंदाज आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज