हो चि मिन्ह सिटी (व्हिएतनाम) : भारताच्या अजय जयराम आणि मिथुन मंजूनाथने व्हिएतनाम ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत अजय जयरामने कॅनडाच्या शेंग शिओडोंगवर २६-२४, २१-१७ अशी मात केली. ही लढत ४२ मिनिटे चालली. अजय जयरामची आता सातव्या मानांकित जपानच्या यू इगारशीविरुद्ध लढत होईल. मिथुनने चीनच्या झ्होयू झेकीवर १७-२१, २१-१९, २१-११ असा विजय मिळवला. मिथुनची आता इंडोनेशियाच्या शेसर हिरेनविरुद्ध लढत होईल. महिला एकेरीत थायलंडच्या फितयापोर्न चैवानने ऋतुपर्णा दासवर २१-१९, २१-१४ अशी मात केली.
अजय जयराम उपांत्य फेरीत
भारताच्या अजय जयराम आणि मिथुन मंजूनाथने व्हिएतनाम ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.
Maharashtra Times 11 Aug 2018, 4:00 am