अ‍ॅपशहर

सिंगापूर ओपनमध्येभारताचे ‘पॅकअप’

​​भारतीय खेळाडूंचे सिंगापूर ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील आव्हान गुरुवारी संपुष्टात आले. यात महिला एकेरीत सिंगापूरच्या युलिया योसेफिन सुसांतोने रितूपर्णा दासवर १५-२१, २१-१३, २१-१६ अशी मात केली, तर पाचव्या मानांकित सायाका ताकाहाशीने ऋत्विका शिवानी गड्डेवर २१-८, २१-१५ असा सहज विजय मिळवला.

Maharashtra Times 20 Jul 2018, 1:00 am
सिंगापूर :
महाराष्ट्र टाइम्स.कॉम indian shuttlers bow out of singapore open
सिंगापूर ओपनमध्येभारताचे ‘पॅकअप’


भारतीय खेळाडूंचे सिंगापूर ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील आव्हान गुरुवारी संपुष्टात आले. यात महिला एकेरीत सिंगापूरच्या युलिया योसेफिन सुसांतोने रितूपर्णा दासवर १५-२१, २१-१३, २१-१६ अशी मात केली, तर पाचव्या मानांकित सायाका ताकाहाशीने ऋत्विका शिवानी गड्डेवर २१-८, २१-१५ असा सहज विजय मिळवला.
पुरुष एकेरीत अग्रमानांकित चोयू टिएन चेनने शुभंकर डेवर २१-१३, २१-१४ असा विजय मिळवला. यानंतर सौरभ वर्माचाही संघर्ष अपूर्ण ठरला. व्हिएतनामच्या टिएन मिन्ह न्गूयेनने सौरभचे आव्हान १८-२१, २१-१५, २१-११ असे परतवून लावले. पुरुष दुहेरीत चीनच्या शुअँयी-रेन जोडीने सात्विकसाईराज-चिराग शेट्टी जोडीला २१-१७, २१-१८ असे नमविले. मिश्र दुहेरीत सातव्या मानांकित ली - चायू जोडीने सात्विकसाईराज- अश्विनी पोनप्पा जोडीवर २१-१४, १६-२१, २१-१४ अशी, तर हाँगकाँगच्या चँग टॅक चिंग-न्ग विंग यंग जोडीने प्रणव चोप्रा-एन. सिक्की रेड्डी जोडीवर २१-१५, २१-११ अशी मात केली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज