म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
अखिल भारतीय आंतर शालेय बॅडमिंटन स्पर्धेसाठी औरंगाबादची उदयोन्मुख बॅडमिंटनपटू मिताली अमित कुलकर्णीची निवड करण्यात आली आहे.
सतरा वर्षांखालील गटात ही स्पर्धा होणार आहे. कौन्सिल फॉर इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झॅमिनेशकडून बंगळुरू येथे सप्टेंबर महिन्यात अखिल भारतीय आंतर शालेय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मिताली ही आत्तापर्यंत पुणे विभागाकडून खेळत होती. या निवडीबद्दल प्रशिक्षक ऋतुपर्ण कुलकर्णी, अमित कुलकर्णी यांनी तिचे अभिनंदन केले आहे.