अ‍ॅपशहर

सात्विक-अश्विनची विजयी सलामी

अटीतटीच्या दुसऱ्या गेममध्ये प्रतिस्पर्ध्यांचे तीन गेम पॉईंट उधळून लावत सात्विकसाईराज रांकीरेड्डी-अश्विनी पोनप्पा या भारताच्या जोडीने बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये विजयी सलामी दिली. चीनमधील नानजिंग येथे सोमवारपासून सुरू झालेल्या या स्पर्धेच्या पहिल्या फेरीत सात्विक-अश्विनी या जोडीने डेन्मार्कच्या निक्लस नोर-सारा थिगसेन यांच्यावर २१-९, २२-२० अशी मात केली.

Maharashtra Times 31 Jul 2018, 6:22 am
वर्ल्ड बॅडमिंटन
महाराष्ट्र टाइम्स.कॉम badminton


वृत्तसंस्था, नानजिंग (चीन)

अटीतटीच्या दुसऱ्या गेममध्ये प्रतिस्पर्ध्यांचे तीन गेम पॉईंट उधळून लावत सात्विकसाईराज रांकीरेड्डी-अश्विनी पोनप्पा या भारताच्या जोडीने बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये विजयी सलामी दिली. चीनमधील नानजिंग येथे सोमवारपासून सुरू झालेल्या या स्पर्धेच्या पहिल्या फेरीत सात्विक-अश्विनी या जोडीने डेन्मार्कच्या निक्लस नोर-सारा थिगसेन यांच्यावर २१-९, २२-२० अशी मात केली.

पहिल्या गेममध्ये सात्विक-अश्विनी यांनी झटपट जिंकला; पण निक्सल-सारा यांनी दुसऱ्या गेममध्ये सात्विक अश्विनीची कसोटी पाहिली. मिश्रमध्येच प्रणव जेरी चोप्रा-सिक्की रेड्डी, सौरभ शर्मा-अनुष्का परिख यांनी विजयाची नोंद करत पहिल्या फेरीचा अडथळा पार केला खरा; पण त्याचवेळी प्राजक्ता सावंत आणि संयोगिता घोरपडे या भारतीय जोडीला मात्र पराभवाचा सामना करावा लागला. तुर्कीच्या बेंगिसू एरसेटिन-नाझलिकन यांनी संयोगिता-प्राजक्ता यांच्यावर २२-२०, २१-१४ असा विजय मिळवला.

समीरला डॅनचे आव्हान

भारताच्या एचएस प्रणॉय, समीर वर्मा यांनी जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी दिली. अकराव्या सीडेड प्रणॉयने न्यूझीलंडच्या अभिनव मनोटावर २१-१२, २१-११ अशी मात केली. ही लढत २८ मिनिटे चालली. जागतिक बॅडमिंटन रँकिंगमध्ये अकराव्या स्थानावर असणाऱ्या प्रणॉयला अभिनवचे आव्हान परतवून लावण्यात फारसे कष्ट पडले नाहीत. आता दुसऱ्या फेरीत त्याची लढत ब्राझीलच्या यगोर कोएल्होविरुद्ध लढत होईल. साईप्रणीतला पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाली आहे. त्याचा प्रतिस्पर्धी कोरियाच्या सन वान हो याने माघार घेतली.

दरम्यान समीर वर्माने फ्रान्सच्या लुकास कोर्व्हीवर २१-१३, २१-१० असा ३९ मिनिटांत विजय मिळवला. या लढतीतील काही दीर्घ रॅलीज रंगल्या. जागतिक रँकिंगमध्ये १९व्या स्थानावर असणाऱ्या समीरचा हा लुकासवरील तिसऱ्या सामन्यातील दुसरा विजय ठरला. आता दुसऱ्या फेरीत समीरसमोर नवव्या सीडेड लिन डॅनचे आव्हान असेल. जागतिक रँकिंगमध्ये चीनचा लीन डॅन नवव्या स्थानावर असून, या वर्षीच्या न्यूझीलंड ओपनमध्ये लीन डॅनने समीरला पराभूत केले आहे.

सामन्यांचे निकाल

पुरुष दुहेरीः मनू अत्री-सुमीत रेड्डी विजयी वि. डॅनिएल निकोलॉव्ह-इव्हान रुसेव्ह २१-१३, २१-१८.

मिश्र दुहेरीः बेंगिसू एरसेटिन-नधलिकन इन्की विजयी वि. संयोगिता घोरपडे-प्राजक्ता सावंत २२-२०, २१-१४.

प्रणव जेरी चोप्रा-सिक्की रेड्डी विजयी वि. सिक्की रेड्डी विजयी वि. जकूब बिटमॅन-अॅलबेता बसोव्हा २१-१७, २१-१५.

सौरभ शर्मा-अनुष्का परिख विजयी वि. नेजो अबाह-पीरजी २१-१३, २१-१२.

रोहन कपूर-कुहू गर्ग विजयी वि. टॉबी एनजी-रचेल हाँड्रिच २१-१९, २१-१६.

सात्विकसाईराज रांकीरेड्डी-अश्विनी पोनप्पा विजयी वि. निक्लस नोहर-सारा थिगसेन २१-९, २२-२०.

पुरुष एकेरीः समीर वर्मा विजयी वि. लुकास कॉरव्ही २१-१३, २१-१०.

प्रणॉय विजयी वि. अभिनव मनोता २१-१२, २१-११

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज