अ‍ॅपशहर

लक्ष्य सेनला रौप्य

भारताचा उदयोन्मुख बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन याला युवा ऑलिम्पिकमधील मुलांच्या एकेरीत रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. मुलांच्या एकेरीच्या अंतिम लढतीत चीनच्या शिफेंग ली याने लक्ष्यवर २१-१५, २१-१९ अशी सरळ गेममध्ये मात केली. यापूर्वी, हे दोघे दोनवेळा आमनेसामने आले होते. त्यात लक्ष्यने बाजी मारली होती. यावेळी मात्र लक्ष्यला पराभवाला सामोरे जावे लागले.

Maharashtra Times 14 Oct 2018, 4:00 am
वृत्तसंस्था, ब्युनो आयर्स
महाराष्ट्र टाइम्स.कॉम shuttler lakshya sen settles for silver in youth olympics
लक्ष्य सेनला रौप्य


भारताचा उदयोन्मुख बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन याला युवा ऑलिम्पिकमधील मुलांच्या एकेरीत रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. मुलांच्या एकेरीच्या अंतिम लढतीत चीनच्या शिफेंग ली याने लक्ष्यवर २१-१५, २१-१९ अशी सरळ गेममध्ये मात केली. यापूर्वी, हे दोघे दोनवेळा आमनेसामने आले होते. त्यात लक्ष्यने बाजी मारली होती. यावेळी मात्र लक्ष्यला पराभवाला सामोरे जावे लागले. ४२ मिनिटे चाललेल्या लढतीत शिफेंगने जोरदार सुरुवात केली. पहिल्या गेममध्ये त्याने १४-५ अशी भक्कम आघाडी घेतली होती. त्यानंतर लक्ष्यने झुंज दिली. मात्र, अखेरपर्यंत आघाडी कायम राखत लक्ष्यने पहिल्या गेममध्ये बाजी मारली.

दुसऱ्या गेममध्ये शिफेंगने १२-७ अशी आघाडी घेतली. त्यानंतर लक्ष्यने झुंज दिली. मात्र, शिफेंगकडे १४-११ अशी आघाडी होती. पाहता पाहता शिफेंगने २०-१७ अशी आघाडी घेतली. अर्थात, शिफेंगकडे तीन मॅच पॉइंट होते. त्यातील दोन पॉइंट शिफेंगने वाचविले. मात्र, तिसरा पॉइंट जिंकत शिफेंगने सुवर्णपदकावर नाव कोरले. सेन म्हणाला, 'शिफेंग चांगला खेळला. मोक्याच्या क्षणी शिफेंगने पॉइंट घेतले.' या स्पर्धेतील मुलांच्या एकेरीत रौप्यपदक मिळविणारा दुसरा भारतीय ठरल्याने आनंद झाल्याचेही लक्ष्यने सांगितले. यापूर्वी, प्रणॉयने २०१० सिंगापूर युथ ऑलिम्पिकमधील मुलांच्या एकेरीत रौप्यपदक मिळविले होते.

दरम्यान, रिले टीम इव्हेंट अल्फा मिक्स संघाने ओमेगा संघावर ११०-१०६ अशी मात केली आणि सुवर्णपदक पटकावले. या सुवर्णविजेत्या संघात लक्ष्य सेनचा समावेश असून, लक्ष्यने मिश्र दुहेरीत स्वीडनच्या अश्वती पिल्लेच्या साथीत आणि श्रीलंकेच्या हासिनी नुसाका अम्बालांगोडागेच्या साथीत कौशल्य पणाला लावले.

भारत उपांत्य फेरीत

हॉकीमध्ये भारतीय मुलींनी उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित केला. उपांत्यपूर्व लढतीत भारताने पोलंडचा ३-० असा पराभव केला. दहाव्याच मिनिटाला लालरेसियामीने गोल नोंदवून भारताचे खाते उघडले. त्यापाठोपाठ चारच मिनिटांनी सलिमा तेते आणि बलजितकौर यांनी गोल नोंदवून भारताला ३-० अशी आघाडी मिळवून दिली. ही आघाडी अखेरपर्यंत कायम राखत भारताने उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित केला. भारताची आता उपांत्य लढतीत चीनचे आव्हान असेल.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज