अ‍ॅपशहर

कुस्तीमध्ये भारताला सलग दुसरे सुवर्णपदक, बजरंगनंतर साक्षी मलिकने मारली बाजी

sakshi malik won the gold medal for india : भारताची महिला कुस्तीपटू साक्षी मलिकने भारताला आज दुसरे सुवर्णपदक जिंकवून दिले. यापूर्नी भारताच्या बजरंग पुनियाने सुवर्णपदकाला गवसमी घातली होती. त्यानंतर आता साक्षीने भारताला सोनेरी यश मिळवून दिले आहे.

Authored byप्रसाद लाड | Maharashtra Times 5 Aug 2022, 11:04 pm
बर्मिंगहम : भारताची महिला कुस्तीपटू साक्षी मलिकने भारताला आज दुसरे सुवर्णपदक जिंकवून दिले. यापूर्नी भारताच्या बजरंग पुनियाने सुवर्णपदकाला गवसमी घातली होती. त्यानंतर आता साक्षीने भारताला सोनेरी यश मिळवून दिले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sakshi malik


भारताची स्टार महिला कुस्तीपटू साक्षी मलिक हिने बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये इतिहास रचला. तिने महिलांच्या 62 किलो फ्रीस्टाइल कुस्तीमध्ये सुवर्णपदक जिंकले. भारतीय कुस्तीपटूने कॅनडाच्या अना गोडिनेझचा पराभव करून राष्ट्रकुल स्पर्धेत पहिले सुवर्ण जिंकले, तर या महाकुंभातील भारताचे हे एकूण 8 वे सुवर्ण आहे. रिओ ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्याने यापूर्वी २०१४ आणि २०१८ च्या राष्ट्रकुल खेळांमध्ये कांस्यपदक जिंकले होते. यावेळी त्याने आपल्या पदकाचा रंग बदलला आणि त्यामुळे आता त्याच्या नावावर या खेळातील 3 पदके झाली आहेत.

बजरंगने पटकावले सुवर्णपदक
भारताचा कुस्तीपटू बजरंग पुनियाने भारताला कुस्तीमधील पहिले सुवर्णपदक जिंकवून दिले. बजरंगने यावेळी अंतिम फेरीत ९-२ असा विजय साकारला आणि देशाला सुवर्णपदक जिंकवून दिले. भारताला कुस्तीमध्ये या स्पर्धेत मिळालेले हे पहिले सुवर्णपदक आहे. टोकियो ऑलिम्पिक पदक विजेता बजरंगला ६५ किलो फ्रीस्टाइल प्रकारात कडव्या स्पर्धेला सामोरे जावे लागले नाही आणि त्याने देशासाठी सहज सुवर्ण जिंकले. अंतिम सामन्यात बजरंगला कॅनडाच्या लचलान मॅकनिलाचे आव्हान होते. हा सामना ९-२ असा जिंकून बजरंगने सुवर्णपदक जिंकले. राष्ट्रकुल स्पर्धेतील हे त्याचे दुसरे आणि एकूण तिसरे सुवर्ण आहे. २०१८ मध्येही त्याने ६५ किलो गटात सुवर्णपदक जिंकले होते. २०१४ मध्ये त्याने ६१ किलो गटात रौप्य पदक जिंकले होते. कॉमनवेल्थ चॅम्पियनशिपमध्येही त्याची दोन सुवर्णपदके आहेत. या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताचे हे सातवे सुवर्ण आणि एकूण २२ वे पदक आहे. कुस्तीमध्ये बजरंगच्या आधी अंशू मलिकने रौप्यपदक जिंकले होते.

अंशु मलिकला रौप्यपदकभारताची महिला कुस्तीपटू अंशू मलिकने आज रौप्यपदकाची कमाई केली. अंशु ही राष्ट्रकुलमध्ये भारताला पदक जिंकवून देणारी पहिली कुस्तीपटू ठरली आहे. अंशुचे सुवर्णपदक यावेळी फक्त दोन गुणांनी हुकले. तिला अंतिम फेरीत ४-६ असा पराभव पत्करावा लागला. महिलांच्या ५७ किलो वजनी गटाच्या फायनलमध्ये तिची गाठ ओडुनायो फोलसाडे अडेकुरोयेबरोबर होती. अंशू मलिकने येथे सुरुवातीला ती थोडी बचावात्मक दिसत होती. त्यामुळे तिला सुरुवातीचा गुण कमावता आले नाही. पण या गोष्टीचा चांगलाच फायदा नायजेरियन कुस्तीपटूने उचलला आणि सामन्यात २-० अशी आघाडी घेतली होती.
लेखकाबद्दल
प्रसाद लाड
प्रसाद, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. २००६ पासून ते पत्रकारीतेत आहेत. लोकसत्ता, सामना, लोकमत या ठिकाणी त्यांनी काम केले आहे. क्रीडा पत्रकारितेमध्ये ते जवळपास १६ वर्षांपासून आहेत.... आणखी वाचा

महत्वाचे लेख