अ‍ॅपशहर

भारताला लॉन बॉलमध्ये सुवर्णपदक जिंकवून देणारे मधुकांत पाठक आहेत तरी कोण, जाणून घ्या...

भारताच्या विजयाचे सर्वात मोठे श्रेय जाते ते मधुकांत पाठक यांना. मधुकांत यांनी जर पुढाकार घेतला नसता तर हा दिवस भारताला दिसलाच नसता. पाठक हा खेळ परदेशातून भारतात शिकून आले तेव्हा मात्र त्यांच्यावर लोकं हसली होती आणि त्यांच्यावर टीका केली. पण आज भारताच्या महिला संघाने सुवर्णपदक पटकावले आणि पाठक भारावून गेले.

Authored byप्रसाद लाड | Maharashtra Times 2 Aug 2022, 7:13 pm
नवी दिल्ली : भारताच्या महिला लॉन बॉल संघाने ऐतिहासिक सुवर्णपद पटकावले आणि संपूर्ण जगात आता त्यांचा जयघोष सुरु आहे. पण भारताच्या विजयाचे सर्वात मोठे श्रेय जाते ते मधुकांत पाठक यांना. मधुकांत यांनी जर पुढाकार घेतला नसता तर हा दिवस भारताला दिसलाच नसता. लॉन बॉल हा काय खेळ आहे का... एका बॉलने दुसऱ्या बॉलला ढकलत राहायचे, याला खेळ म्हणत नाहीत... असं काही वर्षांपूर्वी म्हटले जात होते. पण भारताच्या महिला लॉन बॉल संघाने या टीकाकारांचे दात घशात टाकले आहेत ते मधुकांत पाठक यांच्यामुळेच.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम lawn ball gold medal


भारताने जे राष्ट्रकुल स्पर्धेत ऐतिहासिक पदक पटकावले, त्याचे श्रेय मधुकांत पाठक यांना जाते. कारण या संघात जे खेळाडू आहेत त्यांना पाठक यांनीच प्रशिक्षक दिले आहे. पाठ हे एक क्रिकेट पंच होते. बऱ्याच क्रिकेटच्या सामन्यांमध्ये त्यांनी पंचगिरी केली आहे. एकदा ते ऑस्ट्रेलियाला गेले होते आणि त्यांनी तेव्हा हा खेळ पहिल्यांदा पाहायला मिळाला. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह वॉ हा खेळत आपल्या घरात खेळत असल्याचे त्यांनी पाहिले. स्टीव्हला यांना त्यांचा भाऊ आणि माजी सलामीवीर मार्कही चांगली साथ देत असल्याचे त्यांना पाहायला मिळाले. या खेळाचा क्रिकेटला चांगलाच फायदा होतो, असे या दोघांचे म्हणणे होते. पण जेव्हा हा खेळ शिकून पाठक भारतात आहे तेव्हा मात्र त्यांना वाईट प्रतिक्रीया मिळाल्या.

याबाबत मधुकांत यांनी सांगितले की, " मी जेव्हा भारतात लॉन बॉल शिकून आलो तेव्हा या खेळाला कोणीच गंभीरपणे घेत नव्हते. लॉन बॉल हा खेळच नाही, असे बरेच जण म्हणत होते. पण मी हार मानली नाही. मी हा खेळ शिकून रांचीमध्ये आलो आणि संघ बांधणीला सुरुवात केली. या खेळासाठी कोणतीच मर्यादा नाही, वयाचीही नाही. कोणत्याही वयातील आणि कोणतेही व्यंग असलेली व्यक्ती हा खेळ खेळू शकते. कारण हा खेळ बुद्धिचा आहे. तुम्ही जेवढा विचार कराल, तेवढे तुम्ही निष्णात होत जाल. प्रत्येक खेळाचे नियम असतात, ते एकदा जाणून घेतले की काम सोपे होते."

लोकांनी टीका केली असली तरी मधुकांत थांबले नाहीत. त्यांनी लॉन बॉलचा संघ बनवायला सुरुवात केली. या गोष्टीचेच फळ भारताला राष्ट्रकुल स्पर्धेत मिळाले. त्यामुळे मधुकांत यांचे या सुवर्णपदकामध्ये मोलाचा वाटा आहे, हे कोणीही विसरू शकत नाही.
लेखकाबद्दल
प्रसाद लाड
प्रसाद, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. २००६ पासून ते पत्रकारीतेत आहेत. लोकसत्ता, सामना, लोकमत या ठिकाणी त्यांनी काम केले आहे. क्रीडा पत्रकारितेमध्ये ते जवळपास १६ वर्षांपासून आहेत.... आणखी वाचा

महत्वाचे लेख