अ‍ॅपशहर

क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच खेळला १२वा खेळाडू

क्रिकेटमध्ये कायम ११ खेळाडू मैदानात खेळतात. पण १४२ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच बारावा खेळाडू कसोटी सामन्यात खेळल्याची घटना घडली आहे. अॅशेस मालिकेतील दुसऱ्या सामन्यात स्टीव्ह स्मिथ गंभीर जखमी झाल्यानंतर त्याच्याजागी मार्नस लाबुशेनने फलंदाजी केली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 Aug 2019, 10:52 am
नवी दिल्ली: क्रिकेटमध्ये कायम ११ खेळाडू मैदानात खेळतात. पण १४२ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच बारावा खेळाडू कसोटी सामन्यात खेळल्याची घटना घडली आहे. अॅशेस मालिकेतील दुसऱ्या सामन्यात स्टीव्ह स्मिथ गंभीर जखमी झाल्यानंतर त्याच्याजागी मार्नस लाबुशेनने फलंदाजी केली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 12th player played in the history of crickey
क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच खेळला १२वा खेळाडू


लंडनमधील लॉर्ड्स मैदानावर नुकताच अॅशेस मालिकेतील दुसरा सामना पार पाडला. या सामन्यात चौथ्या दिवशी स्टीव्ह स्मिथ फलंदाजी करत होता. त्याने ८० धावाही केल्या होत्या. इंग्लिश गोलंदाज जेफ आर्चरचा बॉल त्याच्या मानेवर आदळून बाऊन्स झाला. पण त्याकडे दुर्लक्ष करून चौथ्या दिवशीचा खेळ स्टीव्ह स्मिथने पूर्ण केला. पण पाचव्या दिवशी मात्र सकाळी त्याच्या मानेत वेदना व्हायला लागली. त्याचं डोकं दुखायला लागलं. अखेर त्याला डॉक्टरांकडे न्यावं लागलं. तेव्हा स्मिथची परिस्थिती पाहता संघासोबत आलेला बारावा खेळाडू मार्नस लाबुशेन याला स्मिथच्या जागी खेळण्याची संधी द्यावी अशी मागणी ऑस्ट्रेलियन संघाने मॅच रेफरीकडे केली. मॅच रेफरीने ही मागणी मान्य केली असून येत्या काळात एखाद्या फलंदाजाला अशी दुखापत झाल्यास त्याच्याजागी १२ व्या खेळाडूला संघात समाविष्ट करून खेळवता येणार आहे. असा नवीन नियमच आयसीसीने केला आहे. याआधी एखाद्या खेळाडूला दुखापत झाल्यास त्याच्याजागी १२वा खेळाडूला केवळ क्षेत्ररक्षण करण्याची मुभा होती. आता मात्र हा नियम बदलण्यात आला आहे.

या सामन्यात मार्नस लाबुशेनने फलंदाजी करत अर्धशतकी खेळी केली. सरतीशेवटी हा सामना अनिर्णित राहिला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज