अ‍ॅपशहर

स्थानिक क्रिकेट हंगामात यंदा २०१७ सामने

ईशान्येकडील नऊ राज्यांचा समावेशवृत्तसंस्था, नवी दिल्लीईशान्य भारतातील राज्यांना यावेळच्या स्थानिक क्रिकेट कार्यक्रमात समाविष्ट केल्यामुळे भारतीय ...

PTI 19 Jul 2018, 4:00 am

ईशान्येकडील नऊ राज्यांचा समावेश

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

ईशान्य भारतातील राज्यांना यावेळच्या स्थानिक क्रिकेट कार्यक्रमात समाविष्ट केल्यामुळे भारतीय क्रिकेट बोर्डाला २०१७ सामन्यांचे नियोजन करावे लागणार आहे. रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत यावर्षी एकूण ३७ संघ सहभागी होत आहेत. त्यात ९ राज्ये ही ईशान्य भारतातील आहेत.

मणिपूर, मेघालय, मिझोराम, अरुणाचल प्रदेश, नागालँड, उत्तराखंड, बिहार या राज्यांचा समावेश यावर्षापासून रणजीत होतो आहे. एलिट गटात अ आणि ब विभागात प्रत्येकी ९ संघ असून क गटात १० संघ आहेत. जे नऊ संघ समाविष्ट झाले आहेत, ते प्लेट ग्रुपमध्ये आहेत. या चार गटातील प्रत्येकी दोन संघ उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरणार आहेत. प्लेट ग्रुपमधून जे दोन संघ उपांत्यपूर्व फेरीत जाणार आहेत, ते एलिट गटाच्या क विभागात जातील आणि क गटातील दोन संघ अ आणि ब विभागात जातील.

१३ ते २० ऑगस्टदरम्यान होणाऱ्या महिलांच्या चॅलेंजर ट्रॉफी स्पर्धेने यंदाचा स्थानिक हंगाम सुरू होत आहे. त्यानंतर विजय हजारे राष्ट्रीय वनडे स्पर्धा रंगणार आहे. १९ सप्टेंबर ते २० ऑक्टोबर या कालावधीत ती होईल. रणजी करंडक स्पर्धेला १ नोव्हेंबरपासून प्रारंभ होईल आणि ६ फेब्रुवारी २०१९ला ती संपेल. टी-२० अजिंक्यपद स्पर्धेतील १४० सामनेही असतील. ते सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी खेळले जातील. २३ वर्षांखालील मुलांच्या स्पर्धेत ३०२ सामने होतील. १९ वर्षांखालील मुलांसाठी २८६ सामने असतील.

बीसीसीआयने ईशान्येकडील राज्यांना ज्युनियर्सच्या स्पर्धांमध्ये समाविष्ट करण्याचा विचार केला होता, पण लोढा समितीच्या सुधारणांनुसार या राज्यांना रणजीत खेळविले पाहिजे, अशी शिफारस असल्यामुळे बीसीसीआयची कोंडी झाली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज