अ‍ॅपशहर

द. आफ्रिकेची मालिकेत आघाडी

केशव महाराजच्या गोलंदाजीसमोर तिसऱ्या दिवशी न्यूझीलंडचा दुसरा डाव गडगडल्यामुळे दक्षिण आफ्रिकेने शनिवारी मालिकेतील दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात ८ विकेटनी विजय नोंदवला. या विजयासह दक्षिण आफ्रिकेने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

Maharashtra Times 19 Mar 2017, 12:50 am
वेलिंग्टनः केशव महाराजच्या गोलंदाजीसमोर तिसऱ्या दिवशी न्यूझीलंडचा दुसरा डाव गडगडल्यामुळे दक्षिण आफ्रिकेने शनिवारी मालिकेतील दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात ८ विकेटनी विजय नोंदवला. या विजयासह दक्षिण आफ्रिकेने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 2nd test south africa beat new zealand by eight wickets
द. आफ्रिकेची मालिकेत आघाडी


शनिवारी खेळ सुरू झाल्यानंतर तीन षटकांमध्येच दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव ३५९ धावांत आटोपला. आफ्रिकेने पहिल्या डावात ९१ धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. त्यानंतर दुसऱ्या डावात न्यूझीलंडच्या जीत रावलचा अपवाद वगळता इतर फलंदाजांनी आफ्रिकन गोलंदाजांसमोर शरणागती पत्करल्याने त्यांचा डाव ६३.२ षटकांत १७१ धावांत संपुष्टात आला. सलामीवीर रावलने एकाकी लढत देताना १७४ चेंडूंत १० चौकारांसह ८० धावांची खेळी केली. आफ्रिकेच्या केशव महाराजने ४० धावांत ६ विकेट घेऊन कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. मॉर्ने मॉर्केलने ३ विकेट घेतल्या.

आफ्रिकेसमोर विजयासाठी ८१ धावांचे लक्ष्य होते. आफ्रिकेने २४.३ षटकांत २ विकेटच्या मोबदल्यात ८३ धावा करून विजयावर शिक्कामोर्तब केले. हशिम अमला ३८, तर जेपी ड्युमिनी १५ धावांवर नाबाद राहिले. मालिकेतील अखेरची कसोटी २५ ते २९ मार्चदरम्यान हॅमिल्टनला होणार आहे.

स्कोअरबोर्ड : न्यूझीलंड २६८ आणि ६३.२ षटकांत १७१ (जीत रावल ८०, नील ब्रूम २०, बीजे वॉटलिंग २९, केशव महाराज ६-४०, मॉर्ने मॉर्केल ३-५०) पराभूत विरुद्ध दक्षिण आफ्रिका - पहिला डाव ३५९ आणि दुसरा डाव २४.३ षटकांत २ बाद ८३ (हशिम अमला नाबाद ३८). सामनावीर- केशव महाराज.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज