जयपूर:
शनिवार असूनही आज आयपीएलचा एकच सामना खेळला जाणार आहे. राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबादमध्ये खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात एकही विदेशी स्टार खेळाडू सहभागी होत नाहीय.
मुंबई आणि कोलकाताला हरवल्यानंतर राजस्थानच्या उपांत्य फेरीत जाण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. आयपीएलमध्ये आव्हान टिकवायचे असेल तर आजचा सामना जिंकणं राजस्थानसाठी गरजेचं आहे. पण हा सामना जिंकणं राजस्थानसाठी तितकसं सोपं नाही. रॉयल्सचे जॉफ्रा आर्चर, जोस बटलर, बेन स्टॉक्स हे स्टार खेळाडू मायदेशी परतले आहेत. त्यामुळे रॉयल्सला आता नवीन खेळाडूंवर अवलंबून राहावं लागणार आहे.
तर दुसरीकडे सनरायझर्स हैदराबादचाही जॉनी बेयरेस्टो हा विदेशी स्टार खेळाडूही मायदेशी परतला आहे. त्यामुळे सगळी भिस्त डेव्हिड वॉर्नर आणि राशिद खान या दोघांवर पडली आहे. तेव्हा विदेशी स्टार खेळाडू नसताना हा सामना कोण जिंकतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.