अ‍ॅपशहर

‘अ’संघाचा पराभव

भारत 'अ' संघाला मालिकेतील चौथ्या वन-डे क्रिकेट सामन्यात विंडीज 'अ' संघाकडून ५ धावांनी पराभव पत्करावा लागला. विंडीजने दिलेल्या २९९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारत 'अ' संघाला ९ बाद २९३ धावाच करता आल्या.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Jul 2019, 2:23 am
कूलिज (अँटिग्वा) : भारत 'अ' संघाला मालिकेतील चौथ्या वन-डे क्रिकेट सामन्यात विंडीज 'अ' संघाकडून ५ धावांनी पराभव पत्करावा लागला. विंडीजने दिलेल्या २९९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारत 'अ' संघाला ९ बाद २९३ धावाच करता आल्या. अक्षर पटेलची झुंज अपयशी ठरली. भारतीय संघ मालिकेत ३-१ने आघाडीवर आहे. स्कोअरबोर्ड: विंडीज अ ५० षटकांत ९ बाद २९८ (चेस ८४, थॉमस ७०, चार्टर ५०, अॅम्ब्रिस ४६, खलील अहमद ४-६७, आवेश खान ३-६२) वि. वि. भारत अ ५० षटकांत ९ बाद २९३ (अक्षर पटेल नाबाद ८१, वॉशिंग्टन सुंदर ४५, कृणाल पंड्या ४५, पॉल २-६१, पॉवेल २-४७).
महाराष्ट्र टाइम्स.कॉम a sanghas defeat
‘अ’संघाचा पराभव


भारतीय मुख्य फेरीत

कटक : भारताच्या १५ खेळाडूंनी राष्ट्रकुल टेबल टेनिस स्पर्धेतील वैयक्तिक प्रकारात मुख्य फेरीत प्रवेश केला. यात नऊ महिला, तर सहा पुरुष खेळाडूंचा समावेश आहे. या आधी मानांकित अर्चना कामथ, अयहिका मुखर्जी आणि माधुरिका पाटकर यांना थेट मुख्य फेरीत प्रवेश मिळाला आहे. यात पूजा सहस्त्रबुद्धे, रीत रिस्या, सुरभी पटवारी यांना मुख्य फेरी गाठता आली नाही.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज