अ‍ॅपशहर

'फिक्सिंग' करून पाकिस्तान फायनलमध्ये?

मिनी वर्ल्ड कप मानल्या जाणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पहिल्यांदाच धडक मारणारा पाकिस्तान संघ अचानक संशयाच्या भोवऱ्यात अडकला आहे. 'पाकच्या विजयामागे बाहेरचं कुणीतरी आहे', असं सूचक विधान करून पाकचा माजी कर्णधार आमीर सोहेलनं क्रिकेटवर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.

Maharashtra Times 18 Jun 2017, 12:40 pm
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम aamer sohail accuses pakistan of fixing their way to champions trophy final
'फिक्सिंग' करून पाकिस्तान फायनलमध्ये?


मिनी वर्ल्ड कप मानल्या जाणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पहिल्यांदाच धडक मारणारा पाकिस्तान संघ अचानक संशयाच्या भोवऱ्यात अडकला आहे. 'पाकच्या विजयामागे बाहेरचं कुणीतरी आहे', असं सूचक विधान करून पाकचा माजी कर्णधार आमीर सोहेलनं क्रिकेटवर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.

'कर्णधार सरफराजला कुणीतरी सांगायला हवं की, तू काही महान काम केलेलं नाहीस. पडद्याच्या मागे काय झालं हे आम्हाला माहीत आहे. कुणी भलत्यानेच तुम्हाला जिंकण्यासाठी मदत केलीय. त्यामुळे फार खुश व्हायचं कारण नाही. या संघाला इथवर आणण्यात आलंय', असा गौप्यस्फोट आमीर सोहेलनं केला आहे. अर्थात या सगळ्याचा सूत्रधार कोण, हे मात्र त्यानं जाहीर केलेलं नाही. 'कुणामुळे पाकिस्तान इथपर्यंत आलंय, हे मला विचारू नका. विचारलंत तर मी इतकंच सांगेन की, चाहत्यांच्या प्रार्थना आणि ईश्वराच्या कृपेनेच ते इथे आहेत', असं त्यानं म्हटलंय.

जगभरातील क्रिकेटप्रेमी आता चॅम्पियन्स ट्रॉफीच्या 'महायुद्धा'ची आतुरतेनं वाट पाहताहेत. भारत पुन्हा 'बाप' ठरणार, की पाकिस्तान 'मौका' साधणार, याबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता आहे. अशातच, आमीर सोहेलनं 'फिक्सिंग'चा सनसनाटी दावा केला आहे. पाकिस्तान फायनलपर्यंत पोहोचण्यात मैदानाबाहेरील कुणीतरी कारणीभूत आहे, असं सूचक विधान त्यानं एका वृत्तवाहिनीवरील चर्चेदरम्यान केलंय. त्यानं थेट 'फिक्सिंग' म्हटलं नसलं, तरी त्याच्या बोलण्यातून तसेच संकेत मिळत आहेत.

दरम्यान, या विधानावरून वादंग उसळल्यानंतर, ते वक्तव्य मी वेगळ्या संदर्भात केलं होतं, इंग्लंड-पाकिस्तान सेमी फायनलआधीचं होतं, अशी सारवासारव करण्याचा प्रयत्न सोहेलनं केला आहे. त्याच्या या विधानांची चौकशी व्हावी, पाकला बाहेरून मदत करणारी शक्ती कोणती, हे उघड करावं, अशी मागणी क्रिकेटवर्तुळात होतेय.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज