अ‍ॅपशहर

आदर्शची आगेकूच

गौरव ढमालेच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर अरण्येश्वर स्कूलने शिक्षण विभाग (पुणे मनपा) आणि जिल्हा क्रीडा परिषद यांच्यातर्फे आयोजित १७ वर्षांखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत ज्ञानदा विद्यालयावर ९३ धावांनी विजय नोंदविला. संक्षिप्त धावफलक : अरण्येश्वर स्कूल - १० षटकांत ३ बाद १४१ (गौरव ढमाले नाबाद ६९, तेजस पोपळघाट २-३१) वि.वि. ज्ञानदा विद्यालय - १० षटकांत ४ बाद ४८ (निखिल वांजळे नाबाद १२, गौरव ढमाले १-६, ध्रुव सोहनी १-१२).

Maharashtra Times 2 Oct 2018, 4:00 am
पुणे : गौरव ढमालेच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर अरण्येश्वर स्कूलने शिक्षण विभाग (पुणे मनपा) आणि जिल्हा क्रीडा परिषद यांच्यातर्फे आयोजित १७ वर्षांखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत ज्ञानदा विद्यालयावर ९३ धावांनी विजय नोंदविला. संक्षिप्त धावफलक : अरण्येश्वर स्कूल - १० षटकांत ३ बाद १४१ (गौरव ढमाले नाबाद ६९, तेजस पोपळघाट २-३१) वि.वि. ज्ञानदा विद्यालय - १० षटकांत ४ बाद ४८ (निखिल वांजळे नाबाद १२, गौरव ढमाले १-६, ध्रुव सोहनी १-१२).
महाराष्ट्र टाइम्स.कॉम adarsha takes lead
आदर्शची आगेकूच


श्रीयश उपांत्य फेरीत

पुणे : श्रीयश भोसले, साई बगाटे, भार्गव चक्रदेव, आदर्श गोपाल यांनी रहाटणीमध्ये सुरू असलेल्या सहाव्या जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धेतील १८ वर्षांखालील मुलांतून उपांत्य फेरी गाठली. अव्वल मानांकित श्रीयशने आदि अगरवालवर ११-३, ११-८, ११-९, ११-६ असा, द्वितीय मानांकित आदर्श गोपालने आदित्य जोरीवर ११-८, ११-७, ११-५, १०-१२, ११-१३, ११-७ असा, चौथ्या मानांकित साईने सम्यक मोतलिंगवर ११-९, ११-१३, ११-७, १२-१०, ११-७ असा, तर भार्गवने अरमान जेसवानीवर ११-९, ८-११, ११-९, ११-५, ११-७ असा विजय नोंदविला.

'बिशप्स'चा विजय

पुणे : ऑल्विन अब्राहमचे दोन (१६, ५३ मि.) आणि अजिंक्य काळेच्या एका गोलच्या (२ मि.) जोरावर लॉयला कप फुटबॉल स्पर्धेतील १६ वर्षांखालील मुलांत भारतीय विद्या भवन संघावर ३-० असा विजय नोंदविला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज