अ‍ॅपशहर

विराट कोहलीने श्रीलंकेत फडकावला तिरंगा

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शात्री यांच्या नेतृत्वात टीम इंडियाने श्रीलंकेत स्वातंत्र्यदिन साजरा केला. टीम इंडियाने कँडीमध्ये तिरंगा फडकावत भारताचा ७१वा स्वातंत्र्यदिन दिमाखात साजरा केला. या सोहळ्यानंतर कोहलीने इन्स्टाग्रामवर एक इमोशनल व्हिडिओही शेअर केला. यात त्याने आपल्या बालपणीच्या आठवणी जागवल्या.

Maharashtra Times 15 Aug 2017, 11:07 pm
मटा ऑनलाइन वृत्त। कँडी (श्रीलंका)
महाराष्ट्र टाइम्स.कॉम after independence day celebration kohli shares emotional video over instagram
विराट कोहलीने श्रीलंकेत फडकावला तिरंगा

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शात्री यांच्या नेतृत्वात टीम इंडियाने श्रीलंकेत स्वातंत्र्यदिन साजरा केला. टीम इंडियाने कँडीमध्ये तिरंगा फडकावत भारताचा ७१वा स्वातंत्र्यदिन दिमाखात साजरा केला. या सोहळ्यानंतर कोहलीने इन्स्टाग्रामवर एक इमोशनल व्हिडिओही शेअर केला. यात त्याने आपल्या बालपणीच्या आठवणी जागवल्या.

१५ ऑगस्ट हा दिवस कोहलीच्या आयुष्यात विशेष असा आहे. कारण १५ ऑगस्ट याच दिवशी कोहलीच्या वडिलांचा वाढदिवसही असतो.

आपल्या बालपणीच्या आठवणी ताज्या करत कोहली म्हणाला की, मी जेव्हा लहान होतो तेव्हा दिल्लीत कुटुंबियांसह मी पतंग उडवत असे. चारही बाजूंना फडकणारा तिरंग्याचा मला आणि सर्वच भारतीयांना अभिमान वाटतो असेही कोहली आपल्या व्हिडिओत पुढे म्हणतो.

कँडीमध्ये झालेल्या एका छोट्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात टीम इंडियाव्यतिरिक्त इतरांनीही भाग घेतला. टीम इंडिया ज्या हॉटेलमध्ये थांबली आहे, तिथेही कोहलीने तिरंगा फडकवला. त्यानंतर बीसीसीआयने या समारोहाचा व्हिडिओही ट्विट केला. कसोटी मालिकेनंतर भारत श्रीलंकेविरुद्ध ५ वनडे आणि एक टी-२० मॅच खेळणार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज