अ‍ॅपशहर

विराटच्या टीकाकारांना अमिताभ म्हणाले 'थँक यू'

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी तुलना करणाऱ्या ऑस्ट्रेलियन मीडियावर चहूबाजूंनी टीकेचा भडिमार होत आहे. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनीही या मुद्द्यावरून ऑस्ट्रेलियन मीडियाला फटकारत विराटची पाठराखण केली आहे. 'विराटला 'ट्रम्प' संबोधून तो विजेता आहे हे मान्य केल्याबद्दल ऑसी मीडियाचे आभार!' असा उपरोधिक टोला अमिताभ यांनी हाणला आहे.

Maharashtra Times 22 Mar 2017, 1:48 pm
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम amitabh slams autralian media for criticising virat
विराटच्या टीकाकारांना अमिताभ म्हणाले 'थँक यू'

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी तुलना करणाऱ्या ऑस्ट्रेलियन मीडियावर चहूबाजूंनी टीकेचा भडिमार होत आहे. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनीही या मुद्द्यावरून ऑस्ट्रेलियन मीडियाला फटकारत विराटची पाठराखण केली आहे. 'विराटला 'ट्रम्प' संबोधून तो विजेता आहे हे मान्य केल्याबद्दल ऑसी मीडियाचे आभार!' असा उपरोधिक टोला अमिताभ यांनी हाणला आहे.

भारत-ऑस्ट्रेलियादरम्यान सध्या कसोटी मालिका सुरू असून ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्ह स्मिथ व विराट यांच्यात डीआरएसच्या मुद्यावरून बरीच खडाजंगी झाली. स्मिथनं काही वेळा डीआरएसची मागणी करताना ड्रेसिंग रूमकडं पाहिल्याचा आरोप विराटनं केला होता. त्यावरून ऑस्ट्रेलियन प्रसारमाध्यमे खवळली आणि त्यांनी विराटवर हल्ला चढवला. विराटनं आमच्या खेळाडूंबद्दल खोट्या बातम्या पसरविल्या, पण बीसीसीआयच वा आयसीसीनंही त्याच्यावर कोणतीही कारवाई केली नाही, अशी कडवट टीका ‘द टेलिग्राफ’मधील एका लेखात करण्यात आली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याप्रमाणेच विराटनं प्रसारमाध्यमांना दोषी धरत स्वतःचा चेहरा लपविण्याचा प्रयत्न केला आहे, असं म्हणत त्याची तुलना ट्रम्प यांच्याशी केली होती.

विराटवरील ऑसी मीडियाच्या या टीकेमुळं भारतीय क्रिकेटप्रेमी संतापले आहेत. विराटच्या चाहत्यांनी ऑस्ट्रेलियन मीडियावर टीकेची झोड उठवली आहे. अमिताभ यांनीही त्यांच्या सुरात सूर मिसळत विराटच्या बाजूनं ट्विट केलं आहे.

T 2471 - Aussi media calls Virat, Donald Trump of sports !! ... thank you Aussi media for accepting that he is a winner and the PRESIDENT !! pic.twitter.com/ZOoNtuhtC2 — Amitabh Bachchan (@SrBachchan) March 21, 2017

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज