अ‍ॅपशहर

अर्जुनच्या बाउंसरवर विराट झुकला!

न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिकेतील पहिला सामना रविवारी होणार असून मुंबईत वानखेडे स्टेडियमवर आज भारतीय संघाने भरपूर सराव केला. विशेष म्हणजे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने नेटमध्ये भारताचा कर्णधार विराट कोहली व सलामीवीर शिखर धवन यांना गोलंदाजी केली.

Maharashtra Times 20 Oct 2017, 9:01 pm
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम arjun tendulkar bowls in team india nets at wankhede
अर्जुनच्या बाउंसरवर विराट झुकला!


न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिकेतील पहिला सामना रविवारी होणार असून मुंबईत वानखेडे स्टेडियमवर आज भारतीय संघाने भरपूर सराव केला. विशेष म्हणजे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने नेटमध्ये भारताचा कर्णधार विराट कोहली व सलामीवीर शिखर धवन यांना गोलंदाजी केली.

मुंबईच्या २३ वर्षाखालील आणि १९ वर्षाखालील संभाव्य संघातील गोलंदाज भारतीय संघाच्या सरावात सहभागी झाले आहेत. त्यात एका गोलंदाजावर आज सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या आणि तो होता अर्जुन तेंडुलकर. सचिन तेंडुलकर भारतीय संघात असताना अर्जुन अनेकदा नेटमध्ये सरावादरम्यान दिसायचा. मात्र, तेव्हा गोलंदाजीची संधी त्याला मिळाली नव्हती. ही संधी आज अर्जुनला मिळाली. डावखुऱ्या अर्जुनने केलेल्या माऱ्यावर विराट आणि शिखरने फलंदाजीचा कसून सराव केला. विशेष म्हणजे अर्जुनने टाकलेल्या एका बाउंसरवर विराटला झुकावंही लागलं. अर्जुनसह आणखी एक गोलंदाज या सराव सत्रात सहभागी झाला होता.

न्यूझीलंडचा वेगवान डावखुरा गोलंदाज ट्रेंट बोल्टचे आव्हान भारतीय फलंदाजीपुढे असणार आहे. त्यामुळेच नेटमध्ये डावखुऱ्या गोलंदाजाचा सामना करण्यावर भारताची पहिली फळी भर देत आहे.

दरम्यान, या महिन्याच्या सुरुवातीला अर्जुनने १९ वर्षाखालील मुंबई संघाकडून विनू मंकड ट्रॉफीत पदार्पण केलं. मात्र, तो फारशी चमकदार कामगिरी करू शकला नाही. दोन सामन्यांनंतर त्याला विश्रांती देण्यात आली. या दोन सामन्यांत त्याने ६ षटकांत ६२ धावा दिल्या होत्या.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज