अ‍ॅपशहर

'आर. अश्विन हा गोलंदाजामधील 'ब्रॅडमॅन'- स्टिव्ह वॉ

भारताचा फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन हा गोलंदाजामधील डॉन ब्रॅडमॅन आहे, अशी स्तुतीसुमने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह वॉ यांनी अश्निनवर उधळली आहेत. येत्या २३ फेब्रुवारीपासून भारत-ऑस्ट्रेलिया दरम्यान पहिला कसोटी सामना रंगणार आहे.

Maharashtra Times 14 Feb 2017, 5:06 pm
मटा ऑनलाइन वृत्त । मोनाको
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ashwin is like bradman of bowling at the moment steve waugh
'आर. अश्विन हा गोलंदाजामधील 'ब्रॅडमॅन'- स्टिव्ह वॉ


भारताचा फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन हा गोलंदाजामधील डॉन ब्रॅडमॅन आहे, अशी स्तुतीसुमने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह वॉ यांनी अश्निनवर उधळली आहेत. येत्या २३ फेब्रुवारीपासून भारत-ऑस्ट्रेलिया दरम्यान पहिला कसोटी सामना रंगणार आहे.

तामिळनाडूचा फिरकीपटू रवीचंद्रन अश्विनने बांगलादेशविरुद्धच्या कसोटीत आंतरराष्ट्रीय विक्रम आपल्या नावावर नोंदवला. अश्विनने अवघ्या ४५ कसोटी सामन्यात २५० गडी बाद करण्याचा विक्रम आपल्या नावावर नोंदवला आहे, सर्वात जलद २५० विकेट घेण्याचा विक्रम अश्विनने केल्यानंतर अश्विनवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह वॉने ऑस्ट्रेलियाकडून खेळताना १६८ कसोटी सामने खेळले आहेत. कसोटीत ५५.८५च्या सरासरीने वॉने १०, ९२७ धावा केलेल्या आहेत.

भारतीय संघ हा ऑस्ट्रेलियाचा ४-० असा पराभव करेन, असा दावा भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने केला होता. सौरवचा हा दावा स्टीव्ह वॉने खोडून काढला. भारतीय संघातील खेळाडूंनी आमच्याकडील बऱ्याच खेळाडूंचा सामना याआधी केला नाही. मिशेल स्टार्क हा आमचा सर्वोत्तम गोलंदाज आहे. जोश हेजलवूड हा सध्या चांगलाच फॉर्मात आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया-भारत हा सामना चांगलाच चुरशीचा होऊ शकतो, असं स्टीव्ह वॉ म्हणाला.

डेव्हिड वॉर्नर हा आमचा उत्तम खेळाडू आहे. सलामीला आल्यानंतर तो आक्रमक खेळ खेळतो. परंतु त्याला पहिल्या आणि दुसऱ्या षटकात अश्विनचा सामना करावा लागेल. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाचा सामना करण्यासाठी ऑस्ट्रेलियन संघ सज्ज आहे, असंही स्टीव्ह वॉ म्हणाला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज