अ‍ॅपशहर

कानपूर मालिकेतून अश्विन, जाडेजाला वगळले

भारताचे फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जाडेजा यांना इंग्लंडविरुद्धच्या आगामी टी-२० मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. त्यांच्या जागी अमित मिश्रा आणि परवीझ रसूल या फिरकी गोलंदाजांना संघात स्थान देण्यात आले आहे. मालिकेतील पहिली टी-२० झुंज २६ जानेवारीला कानपूर येथे होणार आहे.

Maharashtra Times 24 Jan 2017, 4:00 am
मटा ऑनलाइन वृत्त । दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ashwin jadeja rested for t20 internationals against england
कानपूर मालिकेतून अश्विन, जाडेजाला वगळले

भारताचे फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जाडेजा यांना इंग्लंडविरुद्धच्या आगामी टी-२० मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. त्यांच्या जागी अमित मिश्रा आणि परवीझ रसूल या फिरकी गोलंदाजांना संघात स्थान देण्यात आले आहे. मालिकेतील पहिली टी-२० झुंज २६ जानेवारीला कानपूर येथे होणार आहे.

बीसीसीआयच्या निवड समितीने भारतीय संघ व्यवस्थापनाशी चर्चा करून अश्विन, जाडेजाला विश्रांती देण्याचा निर्णय घेतला, बीसीसीआयने पत्रकाद्वारे ही माहिती कळवली आहे. आगामी ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका डोळ्यासमोर ठेवून प्रमुख फिरकी गोलंदाजांना विश्रांती देण्याचा निर्णय देण्यात आला आहे.

टी-२० मालिका: पहिली लढत– २६ जानेवारी, कानपूर; दुसरी लढत– २९ जानेवारी, नागपूर; तिसरी लढत– १ फेब्रुवारी, बेंगळुरू.

भारतीय संघ : कोहली (कर्णधार), राहुल, युवराजसिंग, धोनी, रैना, पांडे, पंड्या, पंत, मनदीपसिंग, चहल, मिश्र, रसूल, नेहरा, भुवनेश्वरकुमार, बुमराह.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज