अ‍ॅपशहर

मुशफिकरच्या खेळीमुळे बांगलादेशला आधार

मुशफिकर रहीमच्या १४४ धावांच्या धडाकेबाज खेळीमुळे बांगलादेशने आशिया कप क्रिकेट स्पर्धेत सलामीच्या सामन्यात श्रीलंकेविरुद्ध ४९...

Maharashtra Times 16 Sep 2018, 2:16 am
दुबई : मुशफिकर रहीमच्या १४४ धावांच्या धडाकेबाज खेळीमुळे बांगलादेशने आशिया कप क्रिकेट स्पर्धेत सलामीच्या सामन्यात श्रीलंकेविरुद्ध ४९.३ षटकांत २६१ धावा केल्या. त्याला उत्तर देताना श्रीलंकेने २ बाद ३२ धावा केल्या होत्या.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम asia cup bangladesh thrash sri lanka after mushfiqur rahim century
मुशफिकरच्या खेळीमुळे बांगलादेशला आधार


आशिया कप क्रिकेट स्पर्धेला इथे या सामन्याने शनिवारी प्रारंभ झाला. बांगलादेशने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण अवघ्या २ धावांत त्यांचे तीन फलंदाज माघारी परतले. मलिंगाने सलामीवीरांना शून्यावर बाद करून धक्का दिला. पण मुशफिकर आणि मोहम्मद मिथुन यांनी तिसऱ्या विकेटसाठी १३१ धावांची भागीदारी करून संघाची घसरण रोखली. मुशफिकरने १५० चेंडूंत ११ चौकार आणि चार षटकारांसह आपल्या कारकीर्दीतील सर्वोत्तम खेळी साकारली. श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा याचे पुनरागमन मात्र जोरदार झाले. त्याने २०१७नंतर पुन्हा एकदा श्रीलंकेच्या संघात खेळताना २३ धावांत चार बळी टिपले.

स्कोअरबोर्ड : बांगलादेश २६१ (मुशफिकर १४४, मोहम्मद मिथुन ६३, मलिंगा २३-४, डीसिल्व्हा ३८-२) वि. श्रीलंका ३ बाद ३२.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज