अ‍ॅपशहर

अॅशेसः ऑस्ट्रेलियाची इंग्लंडवर २५१ धावांनी मात

स्टिव स्मिथने झळकवलेले दुसरे शतक आणि नॅथन लिऑन यांनी टिपलेल्या ६ गड्यांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने इंग्लंडवर २५१ धावांनी मात केली. या विजयासह ऑस्ट्रेलियाने अॅशेस मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियाकडून विजयासाठी मिळालेल्या ३९८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात अतिशय खराब झाली.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 5 Aug 2019, 11:06 pm
बर्मिंगहॅमः स्टीव स्मिथने झळकवलेले दुसरे शतक आणि नॅथन लिऑन यांनी टिपलेल्या ६ गड्यांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने इंग्लंडवर २५१ धावांनी मात केली. या विजयासह ऑस्ट्रेलियाने अॅशेस मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम austrelia


ऑस्ट्रेलियाकडून विजयासाठी मिळालेल्या ३९८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात अतिशय खराब झाली. संघाची धावसंख्या १२ वर असताना इंग्लंडचे ४ गडी तंबूत परतले. उपहारापर्यंत इंग्लंडची अवस्था ७ गड्यांच्या मोबदल्यात ९७ गडी बाद अशी झाली होती. यानंतर इंग्लंडचा डाव १४६ धावांत आटोपला. ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नॅथन लिऑन याच्या फिरकीच्या जाळ्यात इंग्लंड संघ पूर्णपणे अडकला. दुसऱ्या बाजूने पॅट कमिन्स याने भेदक मारा केला. ४ गडी टिपत त्याने लिऑनला चांगली साथ दिली.

तत्पूर्वी, स्टीव स्मिथ (१४२) आणि मॅथ्यू वेड (११०) यांच्या शतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात धावांचा डोंगर उभा केला. त्यांना ट्रेव्हिड हेड (५१) आणि जेम्स पॅटीन्सन (४७) यांनी बहुमोल साथ दिली. ऑस्ट्रेलियाने आपला दुसरा डाव ७ गड्यांच्या मोबदल्यात ४८७ धावांवर घोषित केला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज