अ‍ॅपशहर

यष्टीतील मायक्रोफोनबाबत प्रश्नचिन्ह

यष्टीमधील मायक्रोफोनद्वारे सर्वांना ऐकू येणारे क्रिकेटपटूंचे संभाषण हा आता चिंतेचा विषय बनत चालला आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेटर्स असोसिएशनने या मायक्रोफोनसंदर्भात चिंता प्रकट केली आहे.

PTI 29 Dec 2018, 4:43 am
वृत्तसंस्था, मेलबर्न
महाराष्ट्र टाइम्स.कॉम aca


यष्टीमधील मायक्रोफोनद्वारे सर्वांना ऐकू येणारे क्रिकेटपटूंचे संभाषण हा आता चिंतेचा विषय बनत चालला आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेटर्स असोसिएशनने या मायक्रोफोनसंदर्भात चिंता प्रकट केली आहे. या मायक्रोफोनद्वारे जे संभाषण ऐकू येते त्यामुळे खेळाडूंवर निष्कारण निर्बंध घातले जाऊ शकतात. हे संभाषण जाणीवपूर्वक असतेच असे नाही, असे मत या असोसिएशनचे प्रमुख अॅलिस्टर निकोलसन यांनी मांडले आहे.

क्रिकेटर्स असोसिएशनने या मायक्रोफोनच्या वापराला विरोध केलेला नाही पण त्याबाबतीतले नियम स्पष्ट व्हायला हवेत, असे त्यांचे म्हणणे आहे.

निकोलसन यांनी म्हटले आहे की, आम्ही नाराज आहोत असे नाही पण कुणी खेळाडू अपघाताने एखादी गोष्ट बोलतो आणि ती मायक्रोफोनमधून ऐकू येते. यातून खेळाडूवर आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल कारवाई केली जाऊ शकते. हे आम्हाला नको आहे.

यष्टीमधील या मायक्रोफोनमुळे ऑस्ट्रेलियाच्या आणि भारताच्याही खेळाडूंची संभाषणे जगभर ऐकू गेली आहेत आणि त्यावरून बरीच चर्चाही होऊ लागली आहे. टिम पेन आणि फिंच यांच्यात रोहित शर्माबद्दल झालेले संभाषण ही ताजी घटना आहे. त्याआधी, इशांत शर्मा आणि रवींद्र जाडेजा यांच्यात झालेला वादही या मायक्रोफोनमुळे स्पष्ट झाला होता. विराट आणि टिम पेन यांच्यातील धारदार संवादही रंगले होते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज