अ‍ॅपशहर

Australiaचा प्रशिक्षक लेहमन यांना क्लीनचिट

चेंडू कुरतडण्याच्या प्रकरणी ऑस्ट्रेलियाचा प्रशिक्षक डेरेन लेहमनला क्लीनचिट देण्यात आली असून दक्षिण आफ्रिका दौऱ्यातही तेच प्रशिक्षक राहणार आहेत. तर डेविड वॉर्नर, स्टीव स्मिथ आणि कॅमेरून बेनक्रॉप्टला दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून डच्चू देण्यात आल्याची घोषणा करतानाच आणखी चोवीस तासात याप्रकरणाची चौकशी पूर्ण होईल, असं क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे सीईओ जेम्स सदरलँड यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी चेंडू कुरतडण्याच्या प्रकरणावर दिलगिरीही व्यक्त केली.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 27 Mar 2018, 11:25 pm
जोहान्सबर्ग: चेंडू कुरतडण्याच्या प्रकरणी ऑस्ट्रेलियाचा प्रशिक्षक डेरेन लेहमनला क्लीनचिट देण्यात आली असून दक्षिण आफ्रिका दौऱ्यातही तेच प्रशिक्षक राहणार आहेत. तर डेविड वॉर्नर, स्टीव स्मिथ आणि कॅमेरून बेनक्रॉप्टला दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून डच्चू देण्यात आल्याची घोषणा करतानाच आणखी चोवीस तासात याप्रकरणाची चौकशी पूर्ण होईल, असं क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे सीईओ जेम्स सदरलँड यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी चेंडू कुरतडण्याच्या प्रकरणावर दिलगिरीही व्यक्त केली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ball tampering row steven smith david warner and cameron bancroft to leave sa
Australiaचा प्रशिक्षक लेहमन यांना क्लीनचिट


क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे सीईओ जेम्स सदरलँड यांनी पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. डेविड वॉर्नर, स्टीव स्मिथ आणि कॅमेरून बेनक्रॉप्ट यांनीच हे कटकारस्थान रचल्याचं चौकशीतून निष्पन्न झाल्याने त्यांना दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीतून डच्चू देण्यात आला आहे. त्यांच्याऐवजी ग्लेन मॅक्सवेल, जो बर्न्स आणि मॅथ्यू रेनशॉ यांना या मालिकेसाठी पाठविण्यात येणार असल्याची माहिती सदरलँड यांनी दिली. चेंडू कुरतडण्याच्या प्रकरणात प्रशिक्षक लेहमन यांचा हात नसल्याचं आढळून आल्यानं त्यांना प्रशिक्षकपदावर कायम ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे त्यांना राजीनामा देण्याची गरज नसल्याचंही त्यांनी सांगितलं.

पेन कर्णधारस्टीव स्मिथला डच्चू देण्यात आल्यानंतर टिम पेनची ऑस्ट्रेलियाच्या संघाचा कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. येत्या २४ तासांत चौकशी पूर्ण झाल्यावर दोषींना शिक्षा सुनावली जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज