धरमशाला : ‘सप्टेंबर महिन्यात आयपीएल टी-२० क्रिकेट स्पर्धेची छोटी आवृत्ती म्हणून मिनी आयपीएल ही स्पर्धा परदेशात खेळवण्याचा आमचा विचार आहे. या स्पर्धेमध्ये कमी सामने असतील,’ अशी माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी दिली. बीसीसीआयच्या कार्यकारिणीच्या बैठकीत त्यांनी ही माहिती दिली. ‘आयपीएलमधील सर्व आठ संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. अजून या स्पर्धेचे स्वरूप निश्चित झाले नसून, अमेरिका किंवा यूएईमध्ये ती होईल,’ असेही त्यांनी सांगितले.
परदेशात होणार मिनी आयपीएल
‘सप्टेंबर महिन्यात आयपीएल टी-२० क्रिकेट स्पर्धेची छोटी आवृत्ती म्हणून मिनी आयपीएल ही स्पर्धा परदेशात खेळवण्याचा आमचा विचार आहे. या स्पर्धेमध्ये कमी सामने असतील,’ अशी माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी दिली.
Maharashtra Times 25 Jun 2016, 1:38 am