अ‍ॅपशहर

गांगुली, लक्ष्मणने एकच पद स्वीकारावे

भारताचे माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांना क्रिकेट सल्लागार समितीचे सदस्य आणि आयपीएल संघाचे मार्गदर्शक अशा दोन्ही भूमिकांत वावरता येणार नाही, असा निष्कर्ष भारतीय क्रिकेट बोर्डाचे आचारसंहिताविषयक अधिकारी डी. के. जैन यांनी काढला आहे.

महाराष्ट्र टाइम्स 23 Jun 2019, 12:08 am
नवी दिल्ली ः भारताचे माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांना क्रिकेट सल्लागार समितीचे सदस्य आणि आयपीएल संघाचे मार्गदर्शक अशा दोन्ही भूमिकांत वावरता येणार नाही, असा निष्कर्ष भारतीय क्रिकेट बोर्डाचे आचारसंहिताविषयक अधिकारी डी. के. जैन यांनी काढला आहे. त्यामुळे या दोघांनाही एकच पर्याय निवडावा लागेल, असा या निष्कर्षाचा अर्थ आहे. लक्ष्मण हा सनरायझर्स हैदराबाद संघाचा मार्गदर्शक असून गांगुली दिल्ली कॅपिटल्स संघाच्या मार्गदर्शकाच्या भूमिकेत आहे. शिवाय, तो बंगाल क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्षही आहे. जैन यांनी सांगितले की, 'एक व्यक्ती एक पद ही लोढा समितीच्या शिफारशींपैकी प्रमुख शिफारस आहे. सचिन तेंडुलकरच्या बाबतीत हितसंबंधांचा मुद्दा येत नव्हता कारण त्याने क्रिकेट सल्लागार समितीतून माघार घेतली. पण गांगुली आणि लक्ष्मणच्या बाबतीत तो अद्याप शिल्लक आहे. त्यासाठी दोघांनीही एका पदाचा स्वीकार करायला हवा.' सचिन हा आयपीएलच्या मुंबई इंडियन्सचा मार्गदर्शक आहे. या तिघांविरुद्ध हितसंबंधांच्या मुद्द्यावरून प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. लक्ष्मणने सल्लागार समितीतून माघार घेण्याची तयारीही दाखविली होती. जैन यांनी रॉबिन उथप्पा आणि इरफान पठाण या सध्या खेळत असलेल्या खेळाडूंबद्दलही मुद्दा उपस्थित केला. हे दोघेही सध्या सुरू असलेल्या वर्ल्डकपमध्ये समालोचकाची भूमिका बजावत आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ganguly-laxman

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज