अ‍ॅपशहर

'ड्रीम टेस्ट टीम'चा कर्णधारही धोनीच

बीसीसीआयने ऐतिहासिक ५००व्या कसोटीचं औचित्य साधून 'ड्रीम टेस्ट टीम'साठी मतं नोंदवण्याचं आवाहन क्रिकेट चाहत्यांना केलं होतं. त्याला उदंड प्रतिसाद मिळाला असून चाहत्यांचा कौल आज जाहीर करण्यात आला. त्यात 'ड्रीम टीम'चा कर्णधार म्हणून भारताचा आतापर्यंतचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनीलाच पसंती मिळाली आहे.

Maharashtra Times 26 Sep 2016, 9:19 pm
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम bcci revealed the dram team of fans dhoni choosen as captain
'ड्रीम टेस्ट टीम'चा कर्णधारही धोनीच

बीसीसीआयने ऐतिहासिक ५००व्या कसोटीचं औचित्य साधून 'ड्रीम टेस्ट टीम'साठी मतं नोंदवण्याचं आवाहन क्रिकेट चाहत्यांना केलं होतं. त्याला उदंड प्रतिसाद मिळाला असून चाहत्यांचा कौल आज जाहीर करण्यात आला. त्यात 'ड्रीम टीम'चा कर्णधार म्हणून भारताचा आतापर्यंतचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनीलाच पसंती मिळाली आहे.

आपली 'ड्रीम टीम' निवडताना चाहत्यांनी सर्वात जास्त मतं भारतीय क्रिकेटचा 'द वॉल' अशी ओळख निर्माण करणाऱ्या राहुल द्रविडच्या पारड्यात टाकली आहेत. द्रविडला ९६ टक्के चाहत्यांचा कौल मिळाला. त्यानंतर ९२ टक्के मते अनिल कुंबळे तर ९१ टक्के मते भारताचा अष्टपैलू माजी कसोटी कर्णधार कपिल देव याच्या पारड्यात पडली. वीरेंद्र सेहवागला ८६ टक्के तर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला ७३ टक्के मते देत चाहत्यांनी आपल्या संघात दोन्ही दिग्गजांना संघात स्थान दिले.

Here are the results of India's #DreamTeam as per fan votes #500thTest pic.twitter.com/RgnrBhwLBw — BCCI (@BCCI) September 26, 2016
या ऐतिहासिक संघात सुनील गावस्कर, व्ही. व्ही. एस. लक्ष्मण, अश्विन, झहीर खान. जवागल श्रीनाथ यांनाही चाहत्यांनी पसंती दिली आहे. स्फोटक डावखुरा फलंदाज युवराज सिंगला या संघात बारावा खेळाडू म्हणून कौल मिळाला आहे.

दरम्यान, बीसीसीआयने आज ट्विटरच्या माध्यमामतून चाहत्यांच्या पोलचा निकाल जाहीर केला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज