अ‍ॅपशहर

भरत अरुण यांच्यामुळे कामगिरीत सातत्य

‘मागील कसोटी मोसम कारकिर्दीतील सर्वोत्तम ठरला. या मोसमात माझ्या कामगिरीत सातत्य राहिले. यासाठी मला खूप मेहनत घ्यावी लागली. मागील चुका टाळून सर्वोत्तम कामगिरी करण्यात भरत अरुण सर यांच्या सूचना महत्त्वपूर्ण ठरल्या,’ अशी प्रतिक्रिया भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादव याने व्यक्त केली.

Maharashtra Times 19 Jul 2017, 4:00 am
वेगवान गोलंदाज उमेश यादवची प्रतिक्रिया
महाराष्ट्र टाइम्स.कॉम bharat aruns tips increased my consistency umesh
भरत अरुण यांच्यामुळे कामगिरीत सातत्य


वृत्तसंस्था, नवी दिल्ली

‘मागील कसोटी मोसम कारकिर्दीतील सर्वोत्तम ठरला. या मोसमात माझ्या कामगिरीत सातत्य राहिले. यासाठी मला खूप मेहनत घ्यावी लागली. मागील चुका टाळून सर्वोत्तम कामगिरी करण्यात भरत अरुण सर यांच्या सूचना महत्त्वपूर्ण ठरल्या,’ अशी प्रतिक्रिया भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादव याने व्यक्त केली.
भरत अरुण यांची भारतीय क्रिकेट संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर यादव बोलत होता. तो म्हणाला, ‘मला संघातून सातत्याने आत-बाहेर व्हावे लागत होते. त्यादरम्यान मी गोलंदाजीवर मेहनत घेतली. यात भरत अरुण सरांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. त्या वेळी तर मी संघातही नव्हतो. जेव्हा मी नागपूरमध्ये असतो तेव्हा सुब्रतो बॅनर्जी सर माझ्या गोलंदाजीच्या शैलीवर मेहनत घेतात. या दोघांचा मी खूप आभारी आहे.’ उमेशने ३१ कसोटींत ८८ विकेट्स घेतल्या आहेत. मागील मोसमात उमेश १३ पैकी १२ कसोटी खेळला. यात त्याने ३० विकेट्स घेतल्या. यातील सर्वाधिक १७ विकेट्स त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध घेतल्या.
या मोसमात उजव्या हाताच्या फलंदाजाला त्याने टाकलेला ‘आउट-स्विंग’ प्रभावी ठरला. यादव म्हणाला, ‘या मोसमापूर्वी चेंडूवर पकड घेण्यावर मी खूपच मेहनत घेतली. त्यामुळे मला गोलंदाजीत वैविध्य राखता आले.’ यादवचा आगामी श्रीलंका दौऱ्यात भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. यात भारतीय संघ तीन कसोटी सामने खेळणार आहे. या मालिकेत कुकाबुरा चेंडू वापरण्यात येणार आहे. त्याची मानसिक तयारी सध्या यादव करतो आहे. तो म्हणाला, ‘पाटा खेळपट्ट्यांवर कुकाबुरा चेंडूने गोलंदाजी करणे आव्हानात्मक असते. कारण २५ षटकानंतर चेंडू थोडा जुना होतो. रेड कुकाबुरावर पहिल्या १५ षटकांतच विकेट घेणे चांगले. एकदा का चेंडूची चकाकी गेली, तर विकेट मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतो.’ याबाबत अधिक विस्ताराने तो म्हणतो, ‘परिस्थिती हाताबाहेरची असेल, तेव्हा वेगळ्या योजना आखाव्या लागतात. अगदी ६५ व्या षटकानंतरही चेंडू रिव्हर्स स्विंग होत असेल, तर तुम्हाला नक्कीच मदत मिळेल. पण तसे घडत नसेल, तर तुम्हाला चौकटीबाहेरचा विचार करावा लागतो. अशा वेळी मी चेंडूला अधिक उसळी मिळावी म्हणून ‘क्रॉस सीम’ चेंडू पकडतो. काही आखूड टप्प्याच्या चेंडूंचा मारा केल्यानंतर मध्येच टाकलेला यॉर्करही अधिक प्रभावी ठरतो.’
...
तंदुरुस्तीची कसोटी
एका मोसमात १२ कसोटी सामने खेळल्यानंतर तंदुरुस्तीची कसोटी लागते. याबाबत यादव म्हणाला, ‘यासाठी मी शारीरिक तंदुरुस्तीसाठी वेगवेगळे सराव करतो. त्यामुळे माझी क्षमता वाढते. यामुळे मला लाँग स्पेलही टाकता येतात. जेवढे तुमचे पाय मजबूत तेवढ्याच वेगाने तुम्ही चेंडू टाकू शकतात. यासाठी मी आमचे ट्रेनर शंकर बासू यांचा आभारी आहे. त्याच्यामुळे मला उच्च दर्जाची तंदुरुस्ती राखता येते.’ यादवला कारकिर्दीत भुवनेश्वरकुमार, जसप्रीत बुमराह यांच्याशी स्पर्धा करावी लागली. मात्र, याची आपण कधी चिंता केली नसल्याचे यादवने सांगितले.
...

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज