बुमराहचे विकेटचे शतक
जसप्रीत बुमराहने श्रीलंकेविरुद्धच्या या लढतीत विकेटचे शतक पूर्ण केले. वन-डेत वेगवान १०० विकेट घेणारा तो भारताचा दुसरा गोलंदाज ठरला आहे. बुमराहने ही कामगिरी ५७ वन-डे सामन्यांत केली आहे. बुमराहच्या नावावर आता १०२ विकेट आहेत. भारताकडून वन-डेत सर्वांत वेगवान १०० विकेट घेण्याचा विक्रम महंमद शमीच्या नावावर आहे. शमीने ५६ वन-डेंत ही कामगिरी केली आहे. सर्वांत कमी वन-डेंत १०० विकेट घेण्याचा विक्रम अफगाणिस्तानच्या रशीद खानच्या नावावर आहे. त्याने ४४ सामन्यांत ही कामगिरी केली आहे. त्या खालोखाल मिचेल स्टार्क (५२), सकलेन मुश्ताक (५३), बाँड (५४), मुस्तफिझूर रहमान (५४), ब्रेट ली (५५) आणि ट्रेंट बोल्ट (५६) यांचा क्रमांक लागतो.