अ‍ॅपशहर

चौथ्या वन-डेसाठी संघात बदलाचे संकेत

विंडीजविरुद्धच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या वन-डेतील कामगिरीने भारताचा कर्णधार विराट कोहलीने समाधान व्यक्त केले. आज (रविवार) होणाऱ्या चौथ्या वन-डे सामन्यासाठी अंतिम संघात बदल करणार असल्याचे संकेत कोहलीने दिले.

Maharashtra Times 2 Jul 2017, 4:00 am
नॉर्थ साउंड (अँटिगा) : विंडीजविरुद्धच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या वन-डेतील कामगिरीने भारताचा कर्णधार विराट कोहलीने समाधान व्यक्त केले. आज (रविवार) होणाऱ्या चौथ्या वन-डे सामन्यासाठी अंतिम संघात बदल करणार असल्याचे संकेत कोहलीने दिले. यामुळे चौथ्या वन-डेत रिषभ पंत, दिनेश कार्तिक आणि महंमद शमी यांना संधी मिळू शकते. अद्याप काही खेळाडूंना संधी मिळालेली नाही. त्यांना विंडीजविरुद्ध खेळवण्याचा विचार आम्ही करीत आहोत, असे कोहली म्हणाला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम change in team for fourth odi
चौथ्या वन-डेसाठी संघात बदलाचे संकेत


पुन्हा एकदा आम्ही चमकदार कामगिरी करू शकलो. सुरुवातीला खेळपट्टीवर थोडे दव होते. याचा फायदा घेत विंडीजच्या गोलंदाजांनी अचूक मारा केला. मात्र, नंतर आमच्या गोलंदाजांनीही विंडीजच्या फलंदाजांवर दबाव निर्माण केला. आणि योग्य वेळी आम्हाला विकेटही मिळत गेल्या, असे कोहली म्हणाला. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत सलामीला येणाऱ्या अजिंक्य रहाणेने तिन्ही वन-डेंत आपली छाप पाडली आहे. त्याने ६२, १०३ आणि ७२ धावा केल्या. ‘या संधीची मी वाट पाहत होतो. मला सलामीला येण्याची संधी दिल्याबद्दल मी कोहली आणि संघ व्यवस्थापनाचा आभारी आहे. मला स्थिरावण्यास थोडा वेळ लागतो. पण एकदा एक स्थिरावलो, तर धावांचा वेग वाढवतो. परिस्थितीनुसार खेळ करायला मला आवडते,’ असे रहाणे म्हणाला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज