अ‍ॅपशहर

मधल्या फळीतील स्पर्धेमुळे उत्सुक: श्रेयस अय्यर

मधल्या फळीतील स्पर्धेमुळे उत्सुकवर्ल्ड कप स्पर्धेला आता अवघ्या १६ महिन्यांचा अवधी शिल्लक आहे त्यासाठी सध्या मधल्या फळीतील जागेचा शोध सुरू आहे...

Maharashtra Times 20 Feb 2018, 2:00 am
वर्ल्ड कप स्पर्धेला आता अवघ्या १६ महिन्यांचा अवधी शिल्लक आहे. त्यासाठी सध्या मधल्या फळीतील जागेचा शोध सुरू आहे. ही संधी साधण्यासाठी मुंबईचा २३ वर्षीय श्रेयस अय्यर उत्सुक आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम competing for middle order slot excites me shreyas iyer
मधल्या फळीतील स्पर्धेमुळे उत्सुक: श्रेयस अय्यर


सध्या चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर चांगली फलंदाजी करू शकणाऱ्या खेळाडूची भारतीय संघ व्यवस्थापन चाचपणी करीत आहे. या जागेसाठी अजिंक्य रहाणे, केदार जाधव, दिनेश कार्तिक, सुरेश रैना यांच्यात स्पर्धा आहे. या शर्यतीत आपणही असल्याचे अय्यरला दाखवून द्यावे लागेल. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन वन-डे सामन्यांत त्याला संधी मिळाली. यातील दोन वन-डेंत त्याला फलंदाजी करता आली. यात त्याने ३० आणि १८ धावांची खेळी केली. तो म्हणाला, 'या स्पर्धेची मला चिंता नाही. या स्पर्धेमाझ्याकडून सर्वोत्तम कामगिरी होऊ शकते. त्यामुळे फलंदाजीच्या क्रमाची मला कधीच भीती वाटत नाही. अर्थात, त्यासाठी मला संघात संधी मिळायला हवी. सध्या तरी मी माझ्या फलंदाजीत सुधारणेवर लक्ष केंद्रित केले आहे. माझा प्रतिस्पर्धी कोण, याची चिंता करण्याचे मला कारण नाही.'

अय्यरने यापूर्वी भारत अ संघात असताना दक्षिण आफ्रिका दौरा केला होता. त्यात त्याने चमक दाखवली होती. अय्यर म्हणाला, 'आताची खेळपट्टी मला अधिक वेगवान वाटली. त्यामुळे माझ्यासाठी हा दौरा खूप काही शिकवणारा ठरला. भरगच्च स्टेडियममध्ये दबावाच्या परिस्थितीत फलंदाजी करण्याची स्थिती तुम्ही विसरू शकत नाही. अर्थात आयपीएलमध्ये मी असा अनुभव घेतला आहे. पण आंतरराष्ट्रीय क्रिकेट वेगळेच असते.' सध्या तरी अय्यरला या जागेवर केदार जाधवही मोठी स्पर्धा करावी लागू शकते. केदारच्या दुखापतीमुळेच अय्यरला तीन वन-डेंत संधी मिळाली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज