अ‍ॅपशहर

पाहा हे क्रिकेट; धोतर, कुर्ता आणि संस्कृत कॉमेंट्री!

येथील संपूर्णानंद संस्कृत विद्यापीठात मंगळवारी एक अनोखा क्रिकेट सामना रंगला. अनोखा अशासाठी की खेळाडू होते चक्क धोतर, कुर्ता परिधान केलेले आणि समालोचन (कॉमेंट्री) होतं चक्क संस्कृतमध्ये!

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 12 Feb 2019, 11:14 pm
वाराणसी :

येथील संपूर्णानंद संस्कृत विद्यापीठात मंगळवारी एक अनोखा क्रिकेट सामना रंगला. अनोखा अशासाठी की खेळाडू होते चक्क धोतर, कुर्ता परिधान केलेले आणि समालोचन (कॉमेंट्री) होतं चक्क संस्कृतमध्ये!

संपूर्णानंद संस्कृत विद्यापीठाच्या शास्त्रार्थ महाविद्यालयाच्या हिरक महोत्सवी वर्षानिमित्त ही क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. गोलंदाजी सुरू झाली तेव्हा समालोचक म्हणाला, 'अतीव सुंदरतया कंदुक प्रक्षेपणेन, दंड चालक: स्तब्धोजात'! लोकांनी अशी कॉमेंट्री ऐकताच टाळ्यांचा कडकडाट केला.

आंतरराष्ट्रीय माजी महिला क्रिकेटपटू नीलू मिश्रा आणि काशी विश्वनाथ मंदिराचे पंडित श्रीकांत मिश्र यांनी यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन झाले. या स्पर्धेत पाच संघ होते. धोतर-कुर्ता घालून या क्रिकेटपटूंना धाव घेताना पाहण्यासाठी प्रेक्षक गॅलरीत गर्दी जमली. संस्कृत भाषेतील कॉमेंट्री ऐकणे हाही प्रेक्षकांसाठी एक आगळावेगळा अनुभव होता.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज