अ‍ॅपशहर

भारतीय खेळाडूबाबत गिलख्रिस्टने केली मोठी चूक; सोशल मीडियावर चाहते भडकले

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या पहिल्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटूने समालोचन करत असताना एक मोठी चूक केली. त्यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी त्याला ट्रोल केले.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 27 Nov 2020, 3:36 pm
नवी दिल्ली: कधी कधी अनावधानाने चूकीची गोष्टी बोलली जाते पण त्यामुळे मोठा गोंधळ उडतो आणि नाराजी निर्माण होतो. सध्या सोशल मीडियाच्या काळात तर अशा गोष्टी व्हायरल होण्यास वेळ लागत नाही. अशीच घटना भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यात घडली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम एडम गिलख्रिस्ट


वाचा- IND vs AUS : स्टीव्ह स्मिथकडून भारतीय गोलंदाजांची धुलाई; केला हा विक्रम

ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज क्रिकेटपटू एडम गिलख्रिस्टने सिडनी येथे सुरू असेलल्या पहिल्या वनडे सामन्यात समालोचन करताना मोठ चूक केली. त्यावरून सोशल मीडियावर त्याला ट्रोल केले. गिलख्रिस्टची चूक भारतीय चाहत्यांनी लक्षात आणून दिल्यावर त्याने माफी मागितली.

वाचा- Phillip Hughes: अजूनही ६३ धावांवर नाबाद, ऑस्ट्रेलियाने गमावला होता युवा खेळाडू



वाचा- दुसरा जसप्रीत बुमराह; यॉर्कर चेंडूने विकेटचे दोन भाग केले, पाहा Video

काही दिवसांपूर्वी भारताचा जलद गोलंदाज मोहम्मद सिराजच्या वडिलांचे निधन झाले होते. सामना सुरू असताना गिलख्रिस्टने फॉक्स चॅनवर समालोचन करताना अनावधानाने सिराजच्या ऐवजी नवदीप सैनीच्या वडिलांचे निधन झाले सा उल्लेख केला. तेव्हा भारतीय चाहत्यांनी त्याला सुनावण्यास सुरूवात केली.


सोशल मीडियावर एका चाहत्याने त्याचा व्हिडिओ शेअर केला आणि गिलख्रिस्टला चूक दाखवून दिली. त्यावर गिलख्रिस्टने चूक मान्य केली आणि माफी मागितली. ज्या भारतीय चाहत्याने चूक दाखवून दिली त्याचे आभार देखील मानले.






महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज