अ‍ॅपशहर

टी-२० वर्ल्ड कप संपताच आली निवृत्तीची बातमी, या स्टार फलंदाजानं स्वतःच दिले संकेत

Test Cricket Retirement News - टी-२० विश्वचषक २०२२ संपताच एका दमदार फलंदाजाने मोठा खुलासा केला आहे. हा खेळाडू लवकरच क्रिकेटच्या फॉरमॅटला अलविदा म्हणू शकतो.

Authored byभक्ती गुरव | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 Nov 2022, 3:31 pm
मुंबई: टी-२० विश्वचषक २०२२ क्रिकेट चाहत्यांसाठी अतिशय संस्मरणीय ठरला. या वेळी या स्पर्धेत अनेक मोठे चढउतारही पाहायला मिळाले. अनेक विविध आणि नवनवीन विक्रम खेळाडूंनी आपल्या नवे केले. नवे खेळाडू आणि त्यांच्या अप्रतिम कामगिरीचा या विश्वचषकात सर्वच क्रिकेटप्रेमींनी आनंद लुटला आहे. अंतिम सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानचा पराभव करत विजेतेपद पटकावले. टी-२० विश्वचषक २०२२ संपताच क्रिकेट चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. या स्पर्धेत फ्लॉप झालेला मार आतापर्यन्त क्रिकेट जगतात कायमच आपल्या नावाचा बोलबाला असलेला खेळाडू लवकरच निवृत्तीची घोषणा करू शकतो.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम David warner Retirement hints


वाचा: फायनलमधील पराभवानंतर बाबर आझम स्पष्टपणे बोलला; दु:ख याचे होते की आम्ही मॅच...

ऑस्ट्रेलियाचा आक्रमक सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने पुढील वर्षी कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचे संकेत दिलेआहेत. असे असले तरी तो मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमध्ये खेळणे सुरू ठेवू शकतो. ऑस्ट्रेलिया पहिल्याच फेरीत टी-२० विश्वचषकातून बाहेर पडल्यानंतर वॉर्नरने ही टिप्पणी केली आहे. वॉर्नर एका कार्यक्रमात म्हणाला, 'कसोटी क्रिकेट हा पहिला फॉरमॅट असेल जो मी सोडू शकतो. कदाचित हे माझे कसोटी क्रिकेटमधील शेवटचे १२ महिने असतील. ऑस्ट्रेलियाचे २०२३ कसोटी क्रिकेटचे वेळापत्रक खूप व्यस्त आहे ज्यात फेब्रुवारी-मार्चमध्ये भारतात होणार्‍या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा समावेश आहे.

हेही वाचा: पाकिस्तानच्या पराभवावर युवराज सिंगचं ट्विट तुफान व्हायरल, वेगळ्याच ढंगात इंग्लंडचे केले

कसोटी क्रिकेटमधील उत्कृष्ट विक्रम

हा ३६ वर्षीय डावखुरा फलंदाज डेव्हिड वॉर्नरने २०११ मध्ये कसोटी सामन्यांमध्ये पदार्पण केले होते. त्याने आतापर्यंत ९६ कसोटी सामन्यांमध्ये ४६.५२ च्या सरासरीने ७८१७ धावा केल्या आहेत, ज्यात २४ शतके आणि ३४ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने १३८ एकदिवसीय सामन्यांमध्ये ४४.६० च्या सरासरीने ५७९९ धावा केल्या आहेत आणि ९९ टी-२० सामन्यांमध्ये ३२.८८ च्या सरासरीने २८९४ धावा केल्या आहेत.

वाचा: अशी नशिबाने थट्टा... तेव्हा कॅच सोडून मॅच गमावली, आता कॅच पकडून झाला पाकिस्तानचा गेम

पुढील वर्षी भारतात वर्ल्ड कप होणार

५० षटकांचा विश्वचषक पुढील वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात खेळवला जाईल, तर २०२४ मध्ये वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत टी-२० विश्वचषक होणार आहे. वॉर्नरने मात्र या दोन्ही स्पर्धांमध्ये खेळण्याची आपली इच्छा असल्याचे स्पष्ट केले. तो म्हणाला, 'पण मला मर्यादित षटकांचे क्रिकेट आवडते, खूपच शानदार सामने असतात. मला टी-२० क्रिकेटमध्ये खेळायला आवडते आणि मला २०२४ च्या विश्वचषकात खेळायचे आहे.
लेखकाबद्दल
भक्ती गुरव
"भक्ती गुरव, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा ३ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. क्रीडासोबतच अर्थविषयक बातम्यांमध्ये रस."... आणखी वाचा

महत्वाचे लेख