अ‍ॅपशहर

अॅशेजः कांगारूंकडून इंग्लंडचा पराभव; मालिकेत आघाडी

ऑस्ट्रेलियाने ५ सामन्यांच्या अॅशेज मालिकेतील चौथ्या कसोटीत इंग्लंड संघाचा १८५ धावांनी पराभव केला. या विजयाबरोबरच ऑस्ट्रेलियाने अॅशेज मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. गेल्यावेळी अॅशेज मालिका ऑस्ट्रेलियाने जिंकली होती.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 9 Sep 2019, 10:31 am
महाराष्ट्र टाइम्स.कॉम cricket
मॅनचेस्टरः ऑस्ट्रेलियाने ५ सामन्यांच्या अॅशेज मालिकेतील चौथ्या कसोटीत इंग्लंड संघाचा १८५ धावांनी पराभव केला. या विजयाबरोबरच ऑस्ट्रेलियाने अॅशेज मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. गेल्यावेळी अॅशेज मालिका ऑस्ट्रेलियाने जिंकली होती.

या कसोटीतील चौथ्या डावात ३८३ धावांचे आव्हान मिळाल्यानंतर इंग्लंडचा संघ १९७ धावांवर सर्वबाद झाला. ऑस्ट्रेलियाकडून पेट कमिंसने सर्वाधिक ४ गडी बाद केले. त्यानंतर जोश हेजलहूड आणि नाथन लियोन यांनी प्रत्येकी २-२ गडी बाद केले. तर मिशेल स्टार्क आणि मार्नल लाबुशेनला १-१ गडी बाद करण्यात यश मिळाले. इंग्लंडकून जो डेनलीने ५३ धावा केल्या.

या कसोटीत ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाच्या स्टिव्ह स्मिथच्या दणकेबाज (२११) धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ८ गड्यांच्या बदल्यात ४९७ धावा केल्या. त्यानंतर डाव घोषित केला. तर इंग्लंडचा पहिला डाव ३०१ धावांत संपुष्टात आला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला १९६ धावांची आघाडी मिळाली. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात ६ गड्यांच्या बदल्यात १८६ धावा करीत डाव घोषित केला. इंग्लंडसमोर ३८३ धावांचे आव्हान ठेवले होते. परंतु, इंग्लंडच्या संघाला हे आव्हान पेलता आले नाही. त्यांचा संघ ९१.३ षटकात केवळ १९७ धावा करू शकला. त्यामुळे त्यांचा पराभव झाला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज