दुबई: आशिया कप क्रिकेट स्पर्धेत येत्या रविवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यात हायव्होटेज लढत होणार आहे. रविवारी म्हणजेच २८ ऑगस्ट रोजी होणाऱ्या या लढतीसाठी दोन्ही संघ सज्ज झाले आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यात द्विपक्षीय मालिका होत नसल्याने आयसीसी किंवा अशा स्पर्धेतच हे संघ एकमेकांसमोर भिडताना दिसतात.
गेल्या वर्षी युएईमध्ये झालेल्या टी-२० वर्ल्डकपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात अखेरची लढत झाली होती. तेव्हा पाकिस्तानने भारताचा १० विकेटनी पराभव केला होता. आता टीम इंडियाला त्या पराभवाची परतफेड करण्याची संधी भारताला आहे. दोन्ही संघ सुपर संडेच्या लढतीसाठी जोरदार तयारी करत आहे.
वाचा-Asia Cup 2022 Schedule: आशिया कपमध्ये भारताच्या किती लढती; पाकिस्तानविरुद्ध ३ मॅच होणार का? एका
दोन्ही संघातील या लढतीच्या प्रत्येक अपडेटकडे संपूर्ण क्रिकेट विश्वाचे लक्ष असताना एक मोठी अपडेट समोर आली आहे. भारताविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानचा मास्टर प्लॉनचा खुलासा झाला आहे. भारताविरुद्धच्या या प्लॉनची माहिती स्वत: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सोशल मीडियावरून दिली आहे.
वाचा-आशिया कपच्या आधी विराट कोहलीच्या फॉर्मबद्दल माजी प्रशिक्षक थेट बोलले; म्हणाले, त्याच्याबद्दलची सर्व...
पीसीबीने शेअर केलेल्या एका व्हिडिओत फलंदाज आसिफ अली म्हणतो, मी रोज १००ते १५० षटकार मारण्याची तयारी करत आहे. यामुळे सामन्यात (भारताविरुद्ध) किमान ४-५ षटकार मारण्यास मदत होईल. अन्य एका व्हिडिओत माजी कर्णधार मोहम्मद युसूफ विकेटकीपर मोहम्मद रिझवानला फलंदाजीचा सराव देत असल्याचे दिसते.
वाचा- पाकिस्तानसाठी मोठे संकट, भारताच्या धोकादायक गोलंदाजाने सुरू केला सराव;
मी रोज १०० ते १५० षटकार मारण्याचा सराव करतोय. यामुळे सामन्यात किमान ५ षटकार तरी मारू शकेन. मी ज्या क्रमांकावर फलंदाजी करतो तेथे १२ ते १४च्या सरासरीने धावा करण्याची गरज असते. ही सरासरी दबाव देणारी असते. सरावात देखील या गोष्टीचा विचार करून तयारी करतोय, असे अलीने सांगितले.