अ‍ॅपशहर

चौथी कसोटी जिंकण्यासाठी भारतीय संघाने घेतली होती मोठी रिस्क

भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या आणि अखेरच्या कसोटीत विजय मिळवण्यासाठी एक मोठी रिस्क घेतली होती. याचा खुलासा संघाचे गोलंदाजीचे कोच भरत अरुण यांनी केला.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 23 Jan 2021, 11:00 am
नवी दिल्ली: ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेत भारतीय संघाने घेतलेल्या एका धाडसी निर्णयामुळे विजय मिळाल्याचे संघाचे गोलंदाजीचे कोच भरत अरुण ( bharat arun) यांनी सांगितले. भारतीय संघाने अखेरच्या ब्रिस्बेन कसोटीत असा एक निर्णय घेतला होता ज्यामुळे मालिका गमवण्याचा धोका होता. पण हा धोका पत्करला आणि त्याचा निकाल भारताने मालिाक २-१ने जिंकली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम भरत अरुण


वाचा- सिडनी कसोटीनंतर विहारीला मिळाली होती द्रविडची शाब्बासकी; पाठवला हा मेसेज

अरुण यांनी सांगितले की, चौथ्या कसोटीत भारताने पाच गोलंदाजांसह खेळण्याचा निर्णय घेतला होता. हा एक प्रकारचा धाडसी निर्णय होता. वॉशिंग्टन सुंदरला पदार्पणाची संधी देण्यात एक मोठी रिस्क होती. त्याने तीन वर्षात एकही प्रथम श्रेणी सामना खेळला नाही. पण सुंदरने सामन्यात शानदार कामगिरी करून संघाच्या विजयाच महत्त्वाचे योगदान दिले.

वाचा- अजिंक्यला कसोटी संघाचे कर्णधार करा; विराट कोहलीचा फायदा

अंतिम कसोटीत एक अतिरिक्त फलंदाज खेळवण्याचा विचार आम्ही केला होता. पण ते एक नकारात्मक पाऊल ठरले असते. त्यामुळे आम्ही पाच गोलंदाजांसह मैदानात उतरलो. आम्ही तो धोका पत्करला आणि निकाल सर्वांसमोर आहे.

वाचा- असे स्वागत कोणत्याच क्रिकेटपटूचे झाले नसेल; टी नटराजनचा व्हिडिओ व्हायरल

ब्रिस्बेनमध्ये पाच गोलंदाजांना संधी देणे ही एक मोठी रिस्क होती. अपयश येईल म्हणून आम्ही निर्णय घेण्याचे टाळले नाही. जरी अपयश आले असते तरी आम्ही पुढील काही सामने याच पद्धतीने खेळलो असतो. प्रत्येक पराभव काही तरी शिकवतो आणि त्यातूनच विजय मिळवता येतो, असे अरुण म्हणाले.

वाचा- पत्नी राधिका आहे अजिंक्यची प्रेरणास्रोत; वाचा दोघांची लव्ह स्टोरी

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज