अ‍ॅपशहर

कोहलीला बाद करण्यासाठी ऑस्ट्रेलियाने अम्पयारचेही ऐकलं नाही, पाहा नेमकं केलं तरी काय...

Virat kohli : विराट कोहली हा मॅचविनर आहे, हे संपूर्ण जगाला माहिती आहे. त्यामुळे कोहलीला बाद करण्यासाठी ऑस्ट्रेलियाने सर्व काही केलं. कोहलीला बाद करण्यासाठी तर त्यांनी मैदानातील पंचांचेही एकले नाही. कोहलीला बाद करण्यासाठी त्यांनी नेमकं केलं तरी काय, मैदानात त्यावेळी असं काय घडलं होतं ते आता फक्त एका क्लिकवर जाणून घ्या...

Authored byप्रसाद लाड | Maharashtra Times 22 Mar 2023, 7:40 pm
चेन्नई : विराट कोहली हा सामना कधीही फिरवू शकतो, हे ऑस्ट्रेलियाला चांगलेच माहिती आहे. त्यामुळे विराटला बाद करण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ काहीही करायला तयार होता. हे सर्व करत असताना ऑस्ट्रेलियाच्या संघाने मैदानातील पंचांचेही ऐकले नाही.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Virat Kohli


रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांची भारताला चांगली सुरुवात करून दिली. पण ऑस्ट्रेलियाच्या सीन अबॉटने १० व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर रोहित शर्माला बाद केला. रोहितला यावेळी ३० धावा करता आल्या. रोहित बाद झाला आणि विराट फलंदाजीला आला. कोहलीने या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर एकेरी धाव घेतली. कोहलीने पहिल्याच चेंडूवर धाव घेत चांगली सुरुवात केली. त्यानंतर गिलने दोन चेंडूंत एक धाव घेतली आणि पाचव्या चेंडूवर कोहली पुन्हा एकदा स्ट्राइकवर आला. या पाचव्या चेंडूवर ही गोष्ट घडल्याचे पाहायला मिळाले.

या षटकाच्या पाचव्या चेंडूवर कोहलीने आपल्या मनात मोठा फटका मारण्याचे ठरवले होते. कारण सीनचा हा चेंडू खेळण्यासाठी कोहली पुढे सरसावला होता. पण सीनने ही गोष्ट पाहिली आणि त्याने चेंडू ऑफ स्टम्पच्या बाहेर टाकला. कोहली या चेंडूवर फटका मारण्यासाठी पुढे सरसावला खरा, पण त्याला या चेंडूवर मोठा फटका मारता आला नाही आणि तो यष्टीरक्षकाच्या ग्लोव्हजमध्ये विसावला. त्यावेळी गोलंदाज सीनने जोरदार अपील केली. यष्टीरक्षकासह ऑस्ट्रेलियाच्या पाच खेळाडूंनी यावेळी जोरदार अपील केली. त्यावेळी भारतीय चाहत्यांच्या काळजात धस्स झालं होतं. पण पंचांनी यावेळी कोहलीला नाबाद असल्याचे ठरवले. भारतीय चाहत्यांना त्यावेळी थोडेसे हायसे वाटले. पण ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने यावेळी पंचांचे ऐकले नाही आणि त्याने डीआरएस घ्यायचा ठरला. या डीआएसमध्ये कोहलीची बॅट ही चेंडूच्या जवळ नव्हती, त्यामुळे तिसऱ्या पंचांनी लगेचच कोहली नाबाद असल्याचे सांगितले आणि ऑस्ट्रेलियाचा रीव्ह्यू वाया गेला.

कोहलीला बाद करण्यासाठी स्मिथने यावेळी रीव्ह्यू घेत कोहलीवर दडपण टाकायचा प्रयत्न केला. पण यामध्ये स्मिथला यश मात्र मिळाले नाही आणि त्यांचा रीव्ह्यू वाया गेला.
लेखकाबद्दल
प्रसाद लाड
प्रसाद, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. २००६ पासून ते पत्रकारीतेत आहेत. लोकसत्ता, सामना, लोकमत या ठिकाणी त्यांनी काम केले आहे. क्रीडा पत्रकारितेमध्ये ते जवळपास १६ वर्षांपासून आहेत.... आणखी वाचा

महत्वाचे लेख