अ‍ॅपशहर

Ind v Aus: भारत दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियाने ७ जणांना दिला डच्चू!

पुढील महिन्यात भारताविरुद्ध होणाऱ्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाच्या संघाची घोषणा झाली आहे. ऑस्ट्रेलियाच्या निवड समितीने आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेत खेळलेल्या सात खेळाडूंना संघातून बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 Dec 2019, 1:10 pm
नवी दिल्ली: पुढील महिन्यात भारताविरुद्ध होणाऱ्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाच्या संघाची घोषणा झाली आहे. ऑस्ट्रेलियाच्या निवड समितीने इंग्लंडमध्ये या वर्षी झालेल्या आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेत खेळलेल्या सात खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Marnus Labuschagne


ऑस्ट्रेलियाचा (India vs Australia) संघ पुढील महिन्यात भारत दौऱ्यावर येत आहे. या दौऱ्यात प्रथम तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठीचा संघ आज जाहीर करण्यात आला. वर्ल्ड कपमध्ये संघात असलेल्या ग्लेन मॅक्सवेल, नाथन लायन, मार्कस स्टोयनिस या खेळाडूंना निवड समितीने डच्चू दिला आहे. तर कसोटी क्रिकेटमध्ये शानदार कामगिरी करणाऱ्या मार्नस काबुशेन याला १४ जणांच्या संघात स्थान देण्यात आले आहे. जोश हेजलवुडचा पुन्हा संघात समावेश झाला आहे.
वाचा-क्रिकेट चाहत्यांना मिळणार आणखी एक सरप्राइज; गांगुली घेणार मोठा निर्णय
भारत दौऱ्यात अ‍ॅरॉन फिंच ऑस्ट्रेलिया संघाचे नेतृत्व करेल. तर अ‍ॅलेक्स कॅरी आणि पॅट कमिंस उपकर्णधार असतील. संघात पाच जलद गोलंदाजांना स्थान देण्यात आले आहे. तर अ‍ॅडम जंपा आणि अ‍ॅश्टन अ‍ॅगर या फिरकीपटूंचा समावेश करण्यात आला आहे.

सात खेळाडूंना दिला डच्चू

भारत दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलिया संघात मोठा फेरबदल करण्यात आला आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या वर्ल्ड कप स्पर्धेत संघात असलेल्या उस्मान ख्वाजा, शॉन मार्श, नाथन कूल्टर नाईल, ग्लेन मॅक्सवेल, नाथन लायन आणि मार्कस स्टोयनिस या ७ जणांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. जेसन बेहरनडॉर्फ जखमी असल्यामुळे भारत दौऱ्यावर येणार नाही.
वाचा-शानदार विजयानंतर देखील विंडीजला शिक्षा; ICC दिला दणका!
भारत दौऱ्यासाठी अशा आहे ऑस्ट्रेलियाचा संघ (Australia ODI Team for India Tour)-
अ‍ॅरॉन फिंच (कर्णधार), सीन अ‍ॅबॉट, अ‍ॅश्टन अ‍ॅगर, अ‍ॅलेक्स कॅरी, पॅट कमिंस, पीटर हॅट्सकॉम्ब, जोश हेजलवुड, मार्नस लाबुशेन, केन रिजर्डसन, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, अ‍ॅश्टन टर्नर, डेव्हिड वॉर्नर आणि अ‍ॅडम जंपा

असा आहे वनडे दौरा

पहिली वनडे- १४ जानेवारी, मुंबई
दुसरी वनडे- १७ जानेवारी, राजकोट
तिसरी वनडे- १९ जानेवारी, बेंगळुरू

मुख्य प्रशिक्षकाला दिली विश्रांती

ऑस्ट्रेलिया संघाने ७ खेळाडूंना डच्चू दिला आहे. त्याच बरोबर भारत दौऱ्यासाठी आणखी एक मोठा बदल केला आहे. मुख्य प्रशिक्षक जस्टिन लॅगर यांना विश्रांती देत अ‍ॅड्यू मेक्डॉनल्ड यांच्याकडे मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी देण्यात आली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज