अ‍ॅपशहर

क्रिकेट सुंदरीने बुमराऐवजी कोहलीला निवडलं, पण का...

आता हे नेमके प्रकरण आहे तरी काय, याचा विचार तुम्ही करत असाल. त्याचबरोबर ही क्रिकेट सुंदरी कोण आणि तिने बुमराऐवजी कोहलीची कशासाठी निवड केली हा प्रश्नदेखील तुम्हाला पडला असेल. त्यासाठी हे प्रकरण जाणून घ्या...

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 5 May 2020, 8:38 pm
सध्याच्या घडीला क्रिकेटमधील एका सुंदर महिला क्रिकेटपटूची सर्वात जास्त चर्चा आहे. या क्रिकेट सुंदरीला एक प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी या सुंदरीने भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराऐवजी कर्णधार विराट कोहलीला निवडलं आहे. पण या क्रिकेट सुंदरीने बुरमाऐवजी कोहलीला का निवडलं ते जाणून घ्या...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Kohli_Bumrah


सध्या करोना व्हायरसमुळे बऱ्याच देशांमध्ये लॉकडाऊन आहे. या गोष्टीचा फटका क्रीडा जगतालाही बसलेला आहे. सध्याच्या घडीला सर्वच क्रीडापटू आपल्या घरीच आहेत, कारण त्यांना सराव करायलाही मिळत नाही. या परिस्थितीमध्ये काही खेळाडू आपले व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत आहेत, तर काही खेळाडूंच्या मुलाखती घेतल्या जात आहेत.

नेमके प्रकरण काय...
या क्रिकेट सुंदरीची एक मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीमध्ये तिला एक कठिण प्रश्न विचारण्यात आला होता. हा प्रश्न असा होता की, तुला जसप्रीत बुमराची गोलंदाजी खेळायला आवडेल की तू विराट कोहलीला गोलंदाजी करणं पसंत करशील? या प्रश्नावर या क्रिकेट सुंदरीने विचार केला. त्यानंतर तिने आपल्याला विराट कोहलीला गोलंदाजी करायला आवडेल, असे सांगितले आहे. काहि दिवसांपूर्वी या क्रिकेट सुंदरी आणि कोहलीला आयसीसीने पुरस्कार देऊन सन्मानित केले होते.

ही क्रिकेट सुंदरी आहे तरी कोण...
आता ही क्रिकेट सुंदरी आहे तरी कोण, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. ही क्रिकेट सुंदरी ऑस्ट्रेलियाची आहे. गेल्या काही वर्षांमध्ये तिने नेत्रदीपक कामगिरी केलेली आहे. त्याचबरोबर तिच्या सौंदर्याची चर्चाही बऱ्याचदा होताना दिसते. ही क्रिकेट सुंदरी आहे ऑस्ट्रेलियाची महिला क्रिकेटपटू एलिसा पेरी. ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या महिलांच्या विश्वचषकात पेरीने दमदार कामगिरी केली होती. त्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली होती.

काही दिवसांपूर्वी भारताचा सलामीवीर मुरली विजयने आपल्याला एलिसाबरोबर डिनरला जायला आवडेल, असे म्हटले होते. एलिसा ही एक सुंदर क्रिकेटपटू आहे आणि तिच्याटबरोबर काही क्षण व्यतित करायला आपल्याला आवडेल, असे मुरली विजयने म्हटले होते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज