अ‍ॅपशहर

आशिया कपसाठी भारतीय संघाची घोषणा; वर्ल्डकपसाठी होणार...

जानेवारी-फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा नंतर केली जाणार आहे. आशिया कप स्पर्धेतील कामगिरीच्या आधारावर विश्वचषकासाठीचा संघ निवडला जाईल.

guest Ashish-Narayan-Kadam | Lipi 10 Dec 2021, 1:02 pm
मुंबई : आगामी आशिया कपसाठी भारताच्या १९ वर्षांखालील संघाची घोषणा करण्यात आली आहे. ऑल इंडिया ज्युनिअर सिलेक्शन कमिटीने २० सदस्यीय संघ निवडला आहे. १९ वर्षांखालील आशिया कप स्पर्धेला २३ डिसेंबरपासून यूएईमध्ये सुरुवात होणार आहे. यावेळी पूर्व-शिबिरासाठीच्या संघाची देखील निवड करण्यात आली आहे. ११ ते १९ डिसेंबरपर्यंत नॅशनल क्रिकेट अॅकॅडमी बंगळुरूमध्ये होणाऱ्या कॅम्पसाठी निवड समितीने २५ सदस्यीय संघ निवडला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम bcci announced india u19 squad for asia cup and preparatory camp
आशिया कपसाठी भारतीय संघाची घोषणा; वर्ल्डकपसाठी होणार...


वाचा- सचिन तेंडुलकरच्या खास मित्राची लाखो रुपयांची फसवणूक, पाहा काय झाले

भारताच्या १९ वर्षांखालील संघाचे नेतृत्व यश धुल करेल. तसेच दिनेश बाना आणि आराध्य यादव यांच्या स्वरूपात दोन यष्टीरक्षक निवडले आहेत. याचबरोबर निशांत सिद्धू, सिद्धार्थ यादव, हरनूर सिंह पन्नू आणि अंगक्रिश रघुवंशी यांसारख्या अनेक तरुण क्रिकेटपटूंचा संघात समावेश करण्यात आला आहे.



वाचा- 'विराटने नकार दिला म्हणून...'; कर्णधारपद काढून घेण्याची गांगुलीने सांगितली पूर्ण कहानी

१९ वर्षांखालील आशिया कपसाठी भारताचा २० सदस्यीय संघ पुढीलप्रमाणे -
हरनूर सिंह पन्नू, अंगक्रिश रघुवंशी, अंश गोसाई, एस.के. राशिद, यश धुल (कर्णधार), अन्नेश्वर गौतम, सिद्धार्थ यादव, कौशल तांबे, निशांत सिंधु, दिनेश बाना (यष्टीरक्षक), आराध्य यादव (यष्टीरक्षक), राजंगद बावा, राजवर्धन हैंगरगेकर, गर्व सांगवान, रवि कुमार, रिशिथ रेड्डी, मानव पारेख, अमृत राज उपाध्याय, विकी ओस्तवाल, वासु वत्स.

वाचा- भारतीय संघात आणखी एका जागेसाठी स्पर्धा सुरू; रोहित शर्माचा...

बंगळुरूमधील एनसीएच्या पूर्व-शिबिरात सहभागी होणारे काही स्टँडबाय खेळाडू पुढीलप्रमाणे -
आयुष सिंह ठाकूर, उदय सहारन, शाश्वत डंगवाल, धनुष गौडा आणि पीएम सिंह राठोड.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज