अ‍ॅपशहर

सौरव गांगुली देणार अध्यक्षपदाचा राजीनामा, BCCI अध्यक्षांच्या शर्यतीत नवे नाव समोर

BCCI President- भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली बीसीसीआयच्या अध्यक्षपदावरून रजेवर गेल्याचे समजते. मात्र मंडळाचे सचिव जय शहा हे नवीन अध्यक्षपदाच्या शर्यतीत नाहीत. विश्वचषक जिंकणारा भारतीय खेळाडू बीसीसीआयचा नवा अध्यक्ष होऊ शकतो.

Authored byभक्ती गुरव | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 7 Oct 2022, 3:42 pm
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून बीसीसीआयची अध्यक्षपदाची चर्चा सुरू आहे. टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुली (Sourav Ganguly) २०१९ मध्ये बोर्डाचा अध्यक्ष बनला होता पण तो राजीनामा देणार असल्याचं सांगण्यात येत आहे. बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेतील (AGM) राज्य संघटना प्रतिनिधींची यादी समोर आली आहे. त्यात अनेक आश्चर्यकारक नावे आहेत. या यादीत समाविष्ट असलेली व्यक्तीच बीसीसीआयची निवडणूक लढवू शकते. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (BCCI) आता नवा अध्यक्ष मिळू शकतो.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम saurav ganguly


रॉजर बिन्नी यांच्या नावाचा समावेश

१९८३ चा विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा भाग असलेला वेगवान गोलंदाज रॉजर बिन्नी याच्या नावाचा समावेश प्रतिनिधींमध्ये करण्यात आला आहे. आतापर्यंत कर्नाटक स्टेट क्रिकेट असोसिएशनच्या वतीने सचिव संतोष मेनन एजीएममध्ये सहभागी होत असत. आता त्यांच्या जागी रॉजर बिन्नीच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार बिन्नी यांचे नाव बीसीसीआयमध्ये मोठे पद मिळणार असल्याने त्यांना देण्यात आले आहे. तो भारतीय संघाचा मुख्य निवडकर्ताही राहिला आहे.

भारतीय संघ असा जिंकणार विश्वचषक? IPLमध्ये १०० टक्के उपस्थिती पण आंतरराष्ट्रीय सामन्यांमधून गायब

बिन्नी नवे अध्यक्ष होऊ शकतात

रॉजर बिन्नी (Roger Binny) बीसीसीआयचे नवे अध्यक्ष होऊ शकतात. यात अविशेक दालमिया यांचेही नाव नाही. ते बीसीसीआयमधील पदाचे दावेदार असल्याचे मानले जात होते. एजीएममध्ये सौरव गांगुली क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगाल (CAB) चे प्रतिनिधी बनल्याने, आता हे स्पष्ट झाले आहे की बीसीसीआयचे माजी अध्यक्ष जगमोहन दालमिया यांचा मुलगा बोर्डाच्या पुढील व्यवस्थेचा भाग असणार नाही.

बुमराहच्या जागी उमरानच परफेक्ट; जाणून घ्या टीम इंडियाला कसा ठरू शकतो फायदेशीर

सचिनच राहणार जय शाह

गुजरात क्रिकेट असोसिएशनचे (GCA) अध्यक्ष जय शाह बोर्डात सचिनच्या भूमिकेत राहू शकतात. दुसरीकडे, हिमाचल प्रदेशचे अरुणसिंह धुमाळ हे खजिनदारपदासाठी दावा मांडणार आहेत. देशाचे माजी अर्थमंत्री अरुण जेटली (Arun Jetley) यांचा मुलगा रोहन जेटली याला बोर्ड किंवा आयपीएलमध्ये (IPL) मोठी भूमिका मिळू शकते. यासोबतच राजीव शुक्ला आणि अनिरुद्ध चौधरी हेही या पदाच्या शर्यतीत आहेत.
लेखकाबद्दल
भक्ती गुरव
"भक्ती गुरव, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा ३ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. क्रीडासोबतच अर्थविषयक बातम्यांमध्ये रस."... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज