अ‍ॅपशहर

सून मयंतीमुळे अडचणीत आले BCCIचे अध्यक्ष; रॉजर बिन्नी यांना नोटीस

BCCI president Roger Binny: बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी यांना बोर्डाच्या एथिक्स अधिकाऱ्याने नोटीस बजावली आहे. या नोटीसला बिन्नी यांना २० डिसेंबरपर्यंत उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत.

Authored byजयकृष्ण नायर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 29 Nov 2022, 9:41 pm
नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयच्या एथिक्स अधिकारी विनीत सरन यांनी बोर्डाचे अध्यक्ष रॉजर बिन्नी यांना नोटीस बजावली आहे. पीटीआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार सरन यांनी बिन्नी यांना या नोटीसीला २० डिसेंबरपर्यंत उत्तर देण्याचे आदेश दिले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Mayanti Langer and Roger Binny


विनीत सरन यांनी बीसीसीआयचे अध्यक्ष बिन्नी यांना conflict of interestची नोटीस बजावली आहे. बिन्नी यांच्यावर करण्यात आलेल्या या आरोपांना २० तारखेपर्यंत उत्तर द्यावे लागणार आहे. या संदर्भात तक्रार करणाऱ्या संजीव गुप्ता यांनी म्हटले आहे की, बिन्नी यांची सून मयंती लॅगर स्टार स्पोर्ट्ससाठी काम करते आणि स्टारकडे भारतीय क्रिकेटच्या देशांतर्गत सत्राचे मीडिया अधिकार आहेत.

वाचा- IND vs NZ: तिसऱ्या वनडेसाठी झोप मोड होणार; जाणून घ्या कधी आणि कुठे होणार लाइव्ह...

काय म्हटले आहे नोटीसमध्ये...

वाचा- फुटबॉल वर्ल्डकप पाहण्यासाठी दिवसाला २० लाख रुपयांचे भाडे देतोय स्टार खेळाडू; सुविधा वाचाल तर...


सरन यांनी पाठवलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे की, तुम्हाला कल्पना दिली जात आहे. बीसीसीआय नियम ३९(२)(बी) नुसार एथिक्स अधिकाऱ्याकडे एक तक्रार आली आहे. या तक्रारीत तुम्ही नियम ३८ (१)(i) आणि नियम ३८ (२) चे उल्लंघन केल्याची तक्रार आली आहे. या तक्रारीवर तुमचे उत्तर २० डिसेंबरपर्यंत लिखित स्वरुपात देण्याचे आदेश दिले जात आहेत. सरन यांनी दिलेल्या नोटीसवर २१ नोव्हेंबरची तारीख आहे.

वाचा-फक्त एक टी-२० मॅच खेळणाऱ्याचे नाव कर्णधारपदासाठी; माजी खेळाडू म्हणाला, टीम इंडियाचे नशीब बदलेल

भारतीय क्रिकेट संघाने १९८३ साली जिंकलेल्या पहिल्या वर्ल्डकप संघात रॉजर बिन्नी होते. ऑक्टोबर महिन्यात ते बीसीसीआयचे ३६वे अध्यक्ष झाले होते. त्यांनी भारताकडून २७ कसोटी आणि २० वनडे खेळल्या आहेत. ८३च्या वर्ल्डकपमध्ये त्यांनी सर्वाधिक १८ विकेट घेतल्या होत्या. याआधी भारतीय संघाच्या निवड समितीवर देखील त्यांनी काम केले आहे. भारताचा माजी ऑलराउंडर स्टुअर्ट बिन्नी हा त्यांचा मुलगा असून मयंती एक अँकर आहे.
लेखकाबद्दल
जयकृष्ण नायर
जयकृष्ण नायर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. महाविद्यालयात युवा सकाळमधून त्यांनी पत्रकारितेची सुरुवात केली. २००९ पासून ते ऑनलाइन पत्रकारीतेत आहेत. प्रहार, स्टार माझा, न्यूज १८ लोकमत अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. देश, विदेश आणि तंत्रज्ञान यासोबत क्रीडा विषयात त्यांची आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख