अ‍ॅपशहर

भारताकडून विराटसह ४ जण खेळणार आशियाई संघात

बांगलादेश क्रिकेट बोर्डाला आशियाई संघासाठी बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीने चार भारतीय खेळाडूंची नावे पाठवली आहेत. बांगलादेशचे संस्थापक शेख मुजीबर रहमान यांच्या जन्मशताब्दी निमित्त आशियाई संघ विरुद्ध वर्ल्ड इलेव्हन यांच्यात दोन टी-२० सामने होणार आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 22 Feb 2020, 12:32 pm
नवी दिल्ली: बांगलादेश क्रिकेट बोर्डाला आशियाई संघासाठी बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीने चार भारतीय खेळाडूंची नावे पाठवली आहेत. बांगलादेशचे संस्थापक शेख मुजीबर रहमान यांच्या जन्मशताब्दी निमित्त आशियाई संघ विरुद्ध वर्ल्ड इलेव्हन यांच्यात दोन टी-२० सामने होणार आहे. यासाठी बीसीसीआयने नावे पाठवली आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Kohli


भारताकडून या दोन सामन्यासाठी कर्णधार विराट कोहली, शिखर धवन, मोहम्मद शमी आणि कुलदीप यादव यांची नावे पाठवण्यात आली आहेत. हो दोन्ही सामना १८ आणि २१ मार्च दरम्यान खेळवले जाणार आहेत.

वाचा- बंदीनंतरच्या पहिल्याच सामन्यात घेतली हॅटट्रिक!

कोणत्या खेळाडूंची नावे पाठवावीत याबद्दल सुरूवातीला संभ्रम होता. कारण आशियातील देश म्हणून पाकिस्तानचे खेळाडू देखील या सामन्यात खेळणार होते आणि भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळे दोन्ही देशांचे खेळाडू एकत्र खेळणार नाहीत असे बीसीसीआयने स्पष्ट केले होते.

वाचा- ट्रम्प यांच्या हस्ते होणार नाही मोटेराचे उद्घाटन

बीसीसीआयचे सहाय्यक सचिव जयेश जॉर्ज यांनी स्पष्ट केले की, पाकिस्तानचे खेळाडू या सामन्यात खेळणार नाही. आम्हाला जी माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार आशियाई संघात पाकिस्तानेच खेळाडू असणार नाहीत.

हे देखील वाचा-
सर ब्रॅडमन यांच्या फलंदाजीचा कलर व्हिडिओ
क्रिकेट बोर्डाने खेळाडूला दिल्या १०० वाइन बॉटल!

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज