अ‍ॅपशहर

फक्त बोलत नाही तर करून दाखवतो, BCCI उभारणार नवीन राष्ट्रीय क्रिकेट अकादमी; सौरव गांगुलीने केली पायाभरणी

बीसीसीआयची सध्याची राष्ट्रीय क्रिकेट अकादमी २००० मध्ये सुरू झाली आणि ती बंगळुरूमधील एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये आहे, पण नवीन अकादमी ही मोठी आणि चांगली असेल.

guest Ashish-Narayan-Kadam | Lipi 14 Feb 2022, 8:03 pm
बंगळुरू : जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट मंडळ म्हणून भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयला ओळखले जाते. क्रिकेटला धर्म मानला जाणाऱ्या भारतात खेळाडूंची काही कमी नाही. यामुळेच देशभरातील क्रिकेटसाठीच्या पायाभूत सुविधा आणखी मजबूत करण्याच्या दिशेने बीसीसीआयने एक मोठे पाऊल उचलले आहे. बीसीसीआय बंगळुरूमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी आणखी मोठी करणार आहे. देशातील या नवीन आणि मोठ्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली आहे. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली, सचिव जय शाह, एनसीए अध्यक्ष व्हीव्हीएस लक्ष्मण आणि इतर उच्च पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सोमवारी (१४ फेब्रुवारी) या अकादमीची पायाभरणी करण्यात आली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम bcci started work on new nca in bengaluru sourav ganguly and jay shah laid foundation stone
फक्त बोलत नाही तर करून दाखवतो, BCCI उभारणार नवीन राष्ट्रीय क्रिकेट अकादमी; सौरव गांगुलीने केली पायाभरणी


एका आयोजित समारंभात भारतीय परंपरा आणि चालीरीतींनुसार हा पायाभरणीचा कार्यक्रम पार पडला. सौरव गांगुली, जय शाह यांनी या समारंभाची छायाचित्रे शेअर करताना म्हटले आहे की, "आज नवीन राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे काम सुरू होत आहे. बंगळुरूमधील नवीन जागेवर कोनशिला उभारण्यात आली."

बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला, कोषाध्यक्ष अरुण धुमाळ, सहसचिव जयेश जॉर्ज आणि एनसीए प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्या उपस्थितीत कोनशिला समारंभ पार पडला. सचिव जय शहा यांनीही ट्विट करून ही आनंदाची बातमी शेअर केली आहे. त्यांनी लिहिले आहे की, "बीसीसीआयने नवीन एनसीएची पायाभरणी केली. खेळाडूंमधील प्रतिभेला ओळखून भारतीय क्रिकेटची संपूर्ण साखळी आणखी उत्कृष्ट करण्यासाठी केंद्र बनवणे, ही आमची दृष्टी आहे."

बीसीसीआयला ही जमीन ९९ वर्षांसाठी भाडेकरारावर मिळाली आहे. नवीन एनसीए वर्षभरात तयार होण्याची अपेक्षा आहे. यामध्ये तीन मैदाने आहेत. या मैदानांवर देशांतर्गत स्पर्धांचे सामनेही आयोजित केले जातील.

सध्याची एनसीए बंगळुरूमधील एम. चिन्नास्वामी स्टेडियमच्या परिसरात कार्यरत आहे. कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनकडे या स्टेडियमची मालकी आहे आणि त्यांनी बीसीसीआयला सरावासाठी बी मैदानासह इनडोअर सरावासाठीच्या सुविधा आणि आधुनिक जिम भाडे तत्वावर दिली आहे. त्यामुळे आता या नवीन अकदामीची उत्सुकता सर्वांनाच असेल.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज