अ‍ॅपशहर

BCCI चा खेळाडूंना कडक इशारा; IPLमध्ये या दोघांच्या शब्दाबाहेर न जाण्याचे आदेश

IPL 2022 : पुढील सलग दोन विश्वचषक स्पर्धा लक्षात घेऊन बीसीसीआयने खेळाडूंसाठी फिटनेस प्लॅन जारी केला आहे. सर्व क्रिकेटपटूंना आयपीएल २०२२ मध्येही या फिटनेस प्लॅनचे पालन करावे लागणार आहे.

guest Ashish-Narayan-Kadam | Lipi 14 Mar 2022, 4:09 pm
नवी दिल्ली: या वर्षी ऑस्ट्रेलियात टी-२० विश्वचषक खेळवला जाणार आहे. त्यानंतर पुढील वर्षी २०२३ मध्ये भारत एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करेल. अशा परिस्थितीत, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सर्व खेळाडूंना राष्ट्रीय क्रिकेट अकादमीने (एनसीए) तयार केलेल्या कठोर फिटनेस सूचनांचे पालन करण्याचा सल्ला दिला आहे. २६ मार्चपासून सुरू होणाऱ्या आयपीएलमध्ये सर्व भारतीय खेळाडूंना या सूचना पाळाव्या लागणार आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम bcci tells players to follow fitness plan and instructions of rahul dravid vvs laxman during ipl too
BCCI चा खेळाडूंना कडक इशारा; IPLमध्ये या दोघांच्या शब्दाबाहेर न जाण्याचे आदेश


वाचा- फॉलोऑन मिळाल्यानंतर लक्ष्मण-द्रविडने मोडला होता ऑस्ट्रेलियाचा...

एनसीएच्या देखरेखीखाली तयार करण्यात आलेला फिटनेस प्लॅन हा आयपीएलदरम्यान खेळणाऱ्या क्रिकेटपटूंना तंदुरुस्त ठेवण्यासाठी बीसीसीआय आणि निवडकर्त्यांच्या सूचनेनुसार तयार करण्यात आला आहे. लीगच्या या मोसमात, एनसीए फिजिओ, प्रशिक्षक आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड खेळाडूंच्या या फिटनेस योजनेचे पालन करतील. बीसीसीआयने आयपीएलच्या सर्व संघांनाही याबाबत माहिती दिली आहे. व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्या नेतृत्वाखालील एनसीए खेळाडूंच्या फिटनेसमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. यासाठी बोर्डाने आयपीएलच्या दोन आठवड्यांपूर्वी सर्व करारबद्ध खेळाडूंना एनसीएच्या फिटनेस मॉनिटरिंग कॅम्पमध्ये बोलावले होते.

वाचा- टीम इंडिया विश्वविक्रमाच्या उंबरठ्यावर; क्रिकेटमध्ये आजवर कोणी केली नाही अशी कामगिरी

एका क्रिकेटपटूने सांगितले की, 'प्रशिक्षक राहुल द्रविडने सांगितले आहे की, तुम्ही भारतासाठी १० महिने खेळता आणि २ महिने आयपीएल खेळता. त्यामुळे फिटनेसच्या बाबतीत तुम्ही सपोर्ट स्टाफ आणि एनसीएवर अवलंबून राहावे. आयपीएल संघाच्या फिजिओ आणि प्रशिक्षकांच्या प्रतिक्रियेवर अनेक खेळाडूंनी चिंता व्यक्त केली, पण आम्हाला हे प्रकरण बीसीसीआयवर सोडण्यास सांगण्यात आले आहे.

वाचा- द्रविड आणि विराटच्या त्या कृतीचे होत आहे कौतुक; पाहा व्हिडिओ

'या प्लॅनमध्ये खेळाडूंना काही अडचण आल्यास ते एनसीए किंवा भारतीय संघाच्या व्यवस्थापनाला आयपीएल दरम्यानही कळवू शकतात,' असेही त्याने यावेळी स्पष्ट केले.
लेखकाबद्दल
जयकृष्ण नायर
जयकृष्ण नायर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. महाविद्यालयात युवा सकाळमधून त्यांनी पत्रकारितेची सुरुवात केली. २००९ पासून ते ऑनलाइन पत्रकारीतेत आहेत. प्रहार, स्टार माझा, न्यूज १८ लोकमत अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. देश, विदेश आणि तंत्रज्ञान यासोबत क्रीडा विषयात त्यांची आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख