अ‍ॅपशहर

Breaking: भारतीय संघातील दोघा क्रिकेटपटूंना करोनाची लागण

शिखर धवनच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेच्या दौऱ्यावर असलेल्या भारतीय क्रिकेट संघातील आणखी दोन खेळाडूंना कोरना व्हायरसची लागण झाली आहे. काही दिवसांपूर्वी क्रुणाल पंड्याला करोनाची लागण झाली होती.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 30 Jul 2021, 12:50 pm
कोलंबो: श्रीलंकेच्या दौऱ्यावर असलेल्या भारतीय क्रिकेट संघाला आणखी एक झटका बसला आहे. काही दिवसांपूर्वी ऑल राउंडर क्रुणाल पंड्याला करोनाची लागण झाली होती. त्यामुळे दुसरी टी-२० लढत एक दिवस पुढे ढकलण्यात आली होती. आता संघातील आणखी दोघा खेळाडूंना करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम चहल आणि गौतम


वाचा- भारतासाठी पदकाचा ठोसा; लव्हलिन बोर्गोहेन उपांत्य फेरीत, टोकियोत दुसरे पदक निश्चित

भारतीय संघातील फिरकीपटू युजवेंद्र चहल आणि के गौतम यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. या दोघांची तिसऱ्या टी-२० सामन्याआधी घेण्यात आलेली चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

वाचा- ऑलिम्पिकमध्ये अविनाश साबळेने स्वत:चा विक्रम मोडला, तरी अंतिम फेरीसाठी पात्र ठरला नाही

हे दोन्ही खेळाडू क्रुणाल पंड्याच्या संपर्कात आले होते. भारत आणि श्रीलंका यांच्यात काल अखेरची टी-२० लढत झाली. भारताचा लंका दौरा संपला असला तरी चहल, गौतम आणि पंड्या यांना कोलंबोत रहावे लागणार आहे. त्याच बरोबर अन्य सहा खेळाडू देखील तेथेच राहतील. यात हार्दिक, पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव, मनिष पांडे, दीपक चाहर आणि इशान किशन यांचा समावेश आहे. भारताचे अन्य खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ आज (३० जुलै) भारतात परत येतील.

चहल आणि गौतम यांच्या टेस्टचे रिपोर्ट आज आले. विशेष म्हणजे गुरुवारी अंतिम टी-२० लढतीच्या आधी घेण्यात आलेल्या चाचणीत या दोघांचे रिपोर्ट नेगेटिव्ह आले होते. या दोघांसह अन्य सहा खेळाडूंचा रिपोर्ट देखील नेगेटिव्ह होता.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज